कोरेगाव भीमा प्रकरण: आयोग स्थापन 6 महिन्यांसाठी; चार वर्षांनंतरही चौकशी सुरूच, 30 जूनपर्यंत 5वी मुदतवाढ


Advertisement

नाशिक/ पुणे39 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोरेगाव भीमात १ जानेवारी २०१८ रोजी निर्माण झालेल्या तणावानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेल्या द्विसदस्यीय चौकशी आयोगाची अजूनही “तारीख पे तारीख’ सुरू आहे. ६ महिन्यांत चौकशी पूर्ण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या या आयोगाची कारवाई चार वर्षांनंतरही सुरूच आहे. नुकतीच पाचव्यांदा ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisement

माजी न्या. जे. एन. पटेल आणि राज्य माहिती आयुक्त सुमीत मलिक यांच्या नेतृत्वाखालील आयोगाला मुंबईत जागा मिळालेली नाही. माहिती आयुक्तांच्या कार्यालयातून हे कामकाज सुरू आहे. आयोगापुढे ४५० प्रतिज्ञापत्रे सादर झाली आहेत. त्यानुसार मुंबई व पुणे येथे साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे कामकाज सुरू झाले. मात्र, ते प्रचंड लांबले आहे. अगोदर निधीच्या प्रतीक्षेत आणि नंतर मुंबईत जागेच्या प्रश्नामुळे आयोगाचे मुंबईत कामकाज होऊच शकलेले नाही. नोव्हेंबरमध्ये पुण्यातील जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement