पुणे22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
काेयत्याचा धाक दाखवत तीन आराेपींनी हडपसर परिसरात पुणे साेलापूर रस्त्यावरील मांजरी येथील शेवाळवाडी परिसरात एका दाम्पत्यास लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारानंतर दाम्पत्याने त्यांच्या मित्रांच्या मदतीने एका चाेरटयाचा पाठलाग करुन त्यास पकडून पोलिसांकडे स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याचे आणखी दाेन साथीदारांना ही अटक केल्याची माहिती शनिवारी दिली आहे.
नामदेव विठू पाटाेळे (23,), दिपक शिवाजी सराेदे (25) व गाेविंद मारुती दुणगे (23, तिघे रा.हडपसर,पुणे) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहे. याप्रकरणी आराेपी विराेधात हडपसर पोलिस ठाण्यात रमेश बाबुराव मुंडे (वय-28) यांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच हा प्रकार 13 जानेवारी राेजी दुपारी सव्वादाेन वाजता घडला होता.
तक्रारदार रमेश मुंडे हे त्यांचे पत्नीसह इमारतीच्या पार्किंगमध्ये दुचाकी घेवुन आले हाेते. त्यावेळी सदर तीन आराेपी हे त्यांचे दिशेने काेयता घेवून येत असल्याचे दिसताच, ते पत्नीसह जिन्याने पळत इमारतीत गेले. त्यावेळी त्यातील एका आराेपीने त्यांचे पाठीमागे पळत येवुन त्यांचा माेबाईल हिसकावून घेतला असता, तक्रारदार यांनी आराेपीस धक्का देवुन दुसऱ्या मजल्यावरील गेटला कडी लावुन मित्रांना फाेन करुन बाेलावुन घेतले. तक्रारदार याचे मित्र ज्ञानेश्वर व गाैरव दुचाकी वर सदर ठिकाणी आले असता, आराेपीचे शाईन गाडीवर पळुन जात असताना त्यापैकी आराेपी नामेदव पाटाेळे यास पकडुन पोलसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हडपसर पोलिसांनी आराेपीच्या अन्य दाेन साथीदारांचा शाेध घेत त्यांना जेरबंद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जाधव करत आहे.
बघण्याचे वादातून अल्पवयीन मुलावर वार
शेकाेटी करत शेकत बसलेल्या एका 16 वर्षीय मुलाने तिथून जाणाऱ्या एका तरुणाकडे बघितल्याचे रागातून, तरुणाने अल्पवयीन मुलाच्या डाव्या हातावर काेयत्याने वार करुन त्यास जखमी केल्याचा प्रकार पुण्यातील खडक परिसरात लाेहियानगर येथे 12 जानेवारी राेजी साडेदहा वाजता घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अतिष दत्तु चांदणे (वय -23,रा.लाेहियानगर, पुणे) या आराेपी विराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडे 16 वर्षाच्या मुलाच्या 38 वर्षीय वडीलांनी तक्रार दाखल केली आहे. खडक पोलिस याबाबत पुढील तपास करत आहे.