मुंबई16 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या आंदोलनामुळे आज पुणे – बंगळुरू महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी त्यांना हात जोडून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, सदाभाऊ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे सामन्यांची पुरती कोंडी झाली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदाभाऊ खोत यांनी 22 मे पासून वारी शेतकऱ्यांची हे आंदोलन सुरू केले आहे. तूर्तास ही पदयात्रा कराड ते सातारा दरम्यानच निघेल. मात्र, राज्य शासनाने मागण्याची पूर्तता केली नाही, तर मुंबईला धडक देऊ, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन राजधानीत धडकणार का, हे पाहावे लागेल.
कशासाठी वारी सुरू?
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सदाभाऊ खोत यांनी हे आंदोलन पुकारले आहे. त्यात ऊस भावासाठी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करा, उसाला चार हजार रुपये भाव द्यावा, दोन कारखान्यांमधील 25 किलोमीटरचे हवाई अंतर कमी करावे, तुकडे बंदी कायदा रद्दा करावा, अशा मागण्या सरकारकडे केल्यात. या मागण्या पूर्ण नाही केल्यास शेकडो वाहने घेऊन मुंबईला धडकू, असा इशारा खोत यांनी दिला आहे.
वाहतुकीचा खोळंबा
रयत क्रांतीच्या आंदोलनात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाय, रयत क्रांती संघटनेचा विजय असो…, सदाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…या नाऱ्यांनी आसमंत दणाणून गेला. या वारीचे आज साताऱ्यात आगमन झाले. मात्र, पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी सदाभाऊ खोत यांना हात जोडून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ते बधले नाहीत. यावेळी पोलिस आणि खोत यांच्या थोडी बाचाबाची झाल्याचे समजते.
इतर बातम्याः
भाजपकडून समान वागणूक मिळत नाही, शिंदे गटाचे खासदार, नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार
जितेंद्र आव्हाड यांच्यावर चौथ्यांदा 450 पानी आरोपपत्र; मारहाण प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपका
उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे यांचे मनोमिलन होणार; उपराजधानीतल्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर; पण शंभूराज देसाई म्हणतात लवकरच होणार!
ईडी चौकशीनंतर अजित पवारांचा फोन नाही; जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, नाराजीच्या चर्चेने धरला जोर!
2024ला ईडी कार्यालयात कोणा-कोणाला पाठवायचे, याची यादी लवकरच जाहीर करू- संजय राऊत