औरंगाबाद5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगर कँन्टोनमेंट बोर्डच्या कॉंग्रेसच्या निवडणुक निरीक्षकपदी अमर राजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० एप्रिल रोजी या निवडणुका होणार आहेत. सात सदस्यांच्या या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती.मात्र आता कॉंग्रेसने या ठिकाणी ताकद निर्माण करण्यासाठी सर्व कँन्टॉनमेन्ट बो़र्डसाठी निवडणुक निरीक्षक नेमले आहेत.
छावणी परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या भागात आपली ताकद निर्माण करण्यासाठी राजकीय पक्ष ताकद लावतात. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची इथे ताकद आहे. युतीची सत्ता इथे कायम राहिली आहे. सात सदस्यापैकी चार सदस्य युतीचे आणि तीन अपक्ष आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा एकही सदस्य इथे नाही.
महाविकास आघाडी एकत्र लढणार निवडणुक
मनपाच्या निवडणुकीपुर्वी ही निवडणुक होणार आहे. त्यामुळे महविकास आघाडी ताकदीने ही जागा लढवणार आहे. त्यासाठी जागा कमी असल्या तरी महाविकास आघाडी ही निवडणुक एकत्र लढणार आहे.
त्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठका देखील झाल्याची माहिती कॉंग्रेस शहरअध्यक्ष युसुफ शेख यांनी दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र लढणार आहे.तसेच महाविकास आघाडीचीच सत्ता यावर राहणार असल्याचा दावा शेख यांनी केला आहे.
हे आहेत निरीक्षक
पुणे कँन्टॉन्मेंट बोर्ड,शिवाजीनगर कँन्टॉन्मेंट बोर्ड तसेच देहु कँन्टॉन्मेंट बोर्डसाठी संग्राम थोपटे यांची निवडणुक निरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे. तर नाशिक देवळालीसाठी कुणाल पाटील अहमदनगरसाठी मोहन जोशी आणि नागपूरसाठी विकास ठाकरे यांची नियुक्ती प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.