केजरीवाल घाबरले: मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांना पोटशूळ; नव्या संसद भवन उदघाटनावरून एकनाथ शिंदेंचे शरसंधान


अहमदनगर31 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध म्हणजे ही विरोधकांचा पोटशूळ आहे. ऐतिहासिक कामाचे श्रेय नरेंद्र मोदींना मिळेल म्हणून ही पोटदुखी आहे. त्यांना घाबरूनच अरविंद केजरीवाल यांच्या भेटीगाठी सुरू आहेत, अशी घणाघाती टीका शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Advertisement

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कन्नड येथे शासन आपल्या दारी योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून 5467 कोटींच्या निधीवाटपाचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती या जुन्याच घोषणांचा पाढा वाचला.

मोदींवर स्तुतिसुमने

Advertisement

एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी येथील सभेतून माणसे उठून गेली होती, असा आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला होता. हाच धागा पकडून एकनाथ शिंदे यांनी आजची गर्दी मीडियाने महाराष्ट्राला दाखवावी, असे आवाहन केले. सर्व सामान्यांना गरिबीतून वर काढण्याचे काम मोदी सरकार करत आहे. जगात लोकप्रियतेच्या बाबतीच मोदी क्रमांक एकवर आहेत. ही अभिमानाची बाब आहे, अशी स्तुतिसुमने त्यांनी पंतप्रधानांवर उधळली.

संसद पवित्र मंदिर

Advertisement

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधकांचा विरोध आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, संसद भवन पवित्र मंदिर आहे. तिथे खासदार जाऊन बसतात. लोकांचे प्रश्न मांडतात. त्यांना न्याय देतात. मोदींनी ऐतिहासिक काम केले. याला काय विरोध करता. एवढे मोठे काम कमी वेळात झाले. त्याचे श्रेय मोदीजींनी मिळेल म्हणून विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. त्यांना पोटदुखी सुरू आहे. राजीव गांधी, इंदिरा गांधींनीही अशी उदघाटने केली. त्याला कोणीही विरोध केला नसल्याचे ते म्हणाले.

ठाकरेंना टोला हाणला…

Advertisement

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाला घाबरून अरविंद केजरीवालांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मात्र, कितीही एकत्र आले. कितीही आघाड्या झाल्या, तरी एकटे मोदी सगळ्यांना भारी आहेत. मात्र, महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. अडीच वर्ष घरात बसणाऱ्यांना ते चांगले ओळखतात म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.

पुन्हा जुनीच टीका

Advertisement

एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्यामागे जनता आहे. आम्ही लोकांना भेटतो. त्यांच्याशी संवाद साधतो. आमच्याकडे लोक आल्यानंतर, त्यांना चहा पाजल्यानंतर तुम्ही चहाचा हिशेब मागतात. चहात सोन्याचे पाणी टाकता का, असे प्रश्न करतात. मात्र, माझ्याकडे येणारी माणसे सोन्यासारखी म्हणत त्यांनी जुन्या वक्तव्याची उजळणी केली.

इतर बातम्याः

Advertisement

विलासराव देशमुखांच्या जयंतीदिनी रितेश – जिनिलीया भावुक; म्हणाले – रोज तुमची आठवण येते, मिस यू पप्पा!

भाजप कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनाचा इशारा; सुरत-चेन्नई ग्रीनफिल्डच्या मोबदल्यासाठी आक्रमक

Advertisement

हे उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे, ठाकरेंच्या अग्रलेखाला भाजपचे उत्तर; सावरकर, महाराष्ट्रद्रोही म्हणून उल्लेखSource link

Advertisement