केंद्रातील सरकार डगमगत आहे: सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली होती; उद्धव ठाकरेंचा भाजपसह मोदींवर हल्लाबोल

केंद्रातील सरकार डगमगत आहे: सरदार पटेलांनी आरएसएसवर बंदी घातली होती; उद्धव ठाकरेंचा भाजपसह मोदींवर हल्लाबोल


जळगाव26 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार डगमगायला लागले आहे. केंद्र सरकार हालायला लागले आहे. मला माझ्या महापौर आणि उपमहापोरांसह इतर सहकाऱ्याचा अभिमान आहे. पोलादी पुरुष केवळ नावाचे नाही तर कामाचे, नाव लावून कुणी काही करु शकेत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, काम करुन जनतेने एखादी उपाधी जनतेने द्यायची अशी तुरळक व्यक्तीपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जळगाव मनपाचे आभारही मानले आहे.

Advertisement

नेमके काय म्हणले ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले की, सरदार पटेलांनी त्याकाळात आरएसएसवर बंदी देखील आणली होती. म्हणजे त्यांना देशप्रेम काय हे कळत होते, पुतळ्याची उंची ठीक आहे. कामाची उंची कधी गाठणार असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावा आहे.

Advertisement

‘पोलादी’ नव्हे तर ‘तकलादू’ पुरुष

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता भारत बोलावे लागेल कारण आजपर्यंत इंडियाचा गवगवा करणाऱ्यांना इंडियाच्या नावाने खाज सुटायला लागली आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. पटेलांनी अभिमानाने मराठवाडा स्वातंत्र करुन घेतला. जशी कारवाई सरदार पटेलांनी मराठवाड्यात केली तशी कारवाई करण्याची हिंमत यांच्यात मणिपूरमध्ये दिसली नाही. आणि स्वत: ला पोलादी पुरुष म्हणून घेताय. तुम्ही तकलादू पुरुष आहात अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

Advertisement

सर्व आमदार शिंदेंसोबत

उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरे करत आहेत. जनतेशी संवादाबरोबरच शेतकऱ्यांशी देखील संवाद साधत आहेत. उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर येत असून शहरात जाहीर सभा होत आहे. अहमदनगर दौऱ्यातही अनेक ठिकाणी भेटी देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत राज्य सरकारच्या योजनांच्या गौडबंगलाविषयी टीका केली होती. जळगाव शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे सर्वच आमदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शिवसेना ठाकरे गटाकडून पाचोरा येथील वैशाली सूर्यवंशी या सोबत आहेत, त्यामुळे आज काय बोलणार याकडे जळगाववासियांचे लक्ष लागले आहे.

AdvertisementSource link

Advertisement