प्रतिनिधी | राहुरी25 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी केल्याच्या निर्णयाविरुद्ध नगर-मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या २५ लोकांविरुद्ध राहुरी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता नगर-मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाबाबत पोलिस प्रशासनास कुठलेही निवेदन देण्यात आले नव्हते. तासभराच्या आंदोलनात रस्त्यावर आडवे झोपलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे, बाळासाहेब जाधव, जुगल गोसावी, रा. टाकळीमिया, दीपक तनपुरे, पिंटू साळवे, रा. राहुरी, विष्णू मुसमाडे, रा. देवळाली प्रवरा, प्रकाश देठे, खुडसरगाव व इतर २५ लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शुक्रवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. नगर-मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलनामुळे विद्यार्थी, रुग्ण, अबाल वृध्द, महिला, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला, असे पोलिसांनी सांगितले.