कॅरेबियन ओडियन आणि शाहरुख खानच्या धडाकेबाज फलंदाजीने पंजाब किंग्सने ५ गडी राखत रॉयल चॅलेन्जर्स बंगळूरवर विजय मिळवला. ओडिन स्मिथला जीवदान दिल्याचा फटका आरसीबीला बसला २०६ धावांचे लक्ष्य ठेऊन देखील बंगळूरला ते रोखता आले नाही. एकाच षटकात मोहमद सिराजने २ विकेट घेतल्या. पण त्यानेच १८व्या षटकात २५ धावा देत आरसीबीला विजयापासून दूर नेले आहे. यावरून हेच सिद्ध होते की, २०० धावा देखील आता सुरक्षित नाहीत. त्यामुळे ड्यू- फरक पडतो यावर विचार होणे गरजेचे असे मत हरभजनसिंगने व्यक्त केले. ओडियन स्मिथला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
https://www.instagram.com/p/CbnbsntrkCT/?utm_source=ig_web_button_share_sheet
बेंगलोर संघाकडून फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसने ५७ चेंडूत सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. या धावा करताना त्याने ३ चौकार आणि तब्बल ७ षटकार ठोकले. विशेष म्हणजे, सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या डू प्लेसिसने सुरुवातीला सावकाश फलंदाजी केली. एकेवेळी १० षटके होऊनही डू प्लेसिस ३० चेंडू खेळत १७ धावांवर खेळत होता. मात्र, त्यानंतर त्याने जो वेग पकडला, तो पाहण्यासारखा होता. त्याच्या फलंदाजीतून नुसता धावांचा पाऊस पडला. त्याने १७.१ षटकापर्यंत ५७ चेंडू खेळताना ८८ धावा ठोकल्या.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध फाफ डू प्लेसिसची कामगिरी
फाफ डू प्लेसिसने आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा अनेकदा सामना केला आहे. यामध्ये जास्त करून त्याच्या वाट्याला यशच आले. फक्त एक वेळा तो शून्य धावेवर तंबूत परतला. त्याच्या पंजाबविरुद्धच्या एकूण डावांबद्दल बोलायचं झालं, तर त्याने यापूर्वी पंजाबविरुद्ध २९, ५२, ०, ५५, ६७, १४, ५४, ९६, ८७*, ४८, ३६*, ७६ आणि ६४ अशा धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या १५व्या हंगामातील दुसऱ्या दिवशी सुपर संडेला डबल हेडर सामने होत आहे. या डबल हेडरमधील दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगळूर यांच्यात डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात दोन्ही संघ नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळणार आहे. पंजाब किंग्जचे नेतृत्व मयांक अग्रवाल तर आरसीबीचे नेतृत्व फाफ ड्युप्लेसिस करणार आहे. या सामन्यात खराब फलंदाजी फॉर्ममधून जात असेल्या विराट कोहलीच्या फलंदाजीकडे विशेष लक्ष होते.