कॅन्टोमेंट भरतीला स्थगिती द्या: कामगार अन् सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेची मागणी


नाशिक2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

देशातील विविध कॅन्टोन्मेंट बोर्डांसह देवळालीतील कॅन्टोमेंटमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतू ज्या पदासाठी भरती करण्यात येत आहे त्या पदावरील पुर्वीपासुन 10 ते 21 वर्षांपासून काम करणाऱ्या अनुभवी कामगारांना बढती देण्यात याावी,तसेच या भरतीत जातीनिहाय आरक्षण लागू करण्यात यावे.

Advertisement

अन्यथा या भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अन्यथा याविरोधात धरणे आंदोलन अथवा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी महासंघाचे सल्लागार व युनियनचे अध्यक्ष एम. आय. खान यांनी दिला आहे.

अखिल भारतीय कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी महासंघाशी संलग्नित असलेल्या कॅन्टोन्मेंट एम्प्लॉईज युनियन व सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने हा पवित्रा घेण्यात आला आहे. मागील काही वर्षांपासून देवळाली कॅन्टोमेंट बोर्ड आर्थिक संकटात सापडले असुन कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. तसेच पुर्वीपासुन ज्या जागेवर कर्मचारी कार्यरत आहे त्यांना बढती न देता त्याच पदांसाठी भरती करण्यात येत आहे. हि भरती प्रक्रिया राबविल्यास प्रशासनावर सुमारे दरमहा 50 लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. या आधीच काही कर्मचाऱ्यांना व 40 सेवानिवृत्ती वेतन धारकांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील फरक दिलेला नाही.

Advertisement

याशिवाय अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहे, त्यांना कायम सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावे आणि शिल्लक जागेवर नव्या कर्मचाऱ्यांची भरती करावी. सन 1994 सालापासून कॅटोन्मेंट बोर्डामध्ये सफाई कर्मचारी भरती करण्यात आली नाही. मागील 15 ते 16 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कामे करून घेतली जात आहे. कामगार न्यायालयात, संरक्षण वसाहतीचे महासंचालक व दक्षिण विभागाचे मुख्य संचालक यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे खान यांनी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष सुरेंद्र मेहरोलिया , चित्रा सोनावणे, कमल किशोर,सेवानिवृत्त आरोग्य अधिक्षक सतीश भातखळे, किशोर साळवे, जगपाल चंडालिया, किशोर गोडसे, संजू राजोरा आदी उपस्थित होते.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement