कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा वादात: शासनाची दिशाभूल करुन शिष्यवृत्ती मिळवल्याचा आरोप, सत्तार यांच्या शाळांची चौकशी करण्याची मागणीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शासनाची दिशाभूल करून शिष्यवृत्ती मिळविलेल्या शाळांच्या यादीमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शाळांची नावे समाविष्ट आहेत, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे.

Advertisement

उच्चस्तरिय चौकशीची मागणी

त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थांची उच्चस्तरिय चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे.

Advertisement

महेश शंकरपल्ली यांनी गैरमार्गाने शिष्यवृत्ती मिळवलेल्या शाळांची यादीही जाहीर केली आहे. या यादीतील अनेक शाळा या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शाळांची मान्यता रद्द करावी

Advertisement

भ्रष्ट मंत्र्याने केवळ पैसा कमावण्यासाठी शाळा सुरू केल्या आहेत. यातून शिक्षणाचा बाजार मांडला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करावी व घोटाळा सिद्ध झाल्यास शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी महेश शंकरपल्ली यांनी केली आहे.

तातडीने शिष्यवृत्ती वसुल करण्याचे आदेश

Advertisement

जिल्हा शिक्षण विभागाने औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळांना नोटीस दिली आहे. शासनाची दिशाभूल करुन चुकीच्या पद्धतीने काही शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही शिष्यवृत्ती तात्काळ वसूल करून शासन खाती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वात जास्त विद्यार्थी म्हणजेच तब्बल 253 विद्यार्थ्यांकडून घेतलेली शिष्यवृत्तीची रक्कम वसूल करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

शिक्षण विभागाने अशा शाळांची यादीच जाहीर केली आहे. या यादीमध्ये कॅबिनेट कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कित्येक शैक्षणिक संस्था शाळांची नावे समाविष्ट आहेत, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी केला आहे.

Advertisement

अब्दुल सत्तार सातत्याने वादाच्या भोवऱ्यात

दरम्यान, कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे गेल्या काही दिवसांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. हिवाळी अधिवेशनात जमिन घोटाळ्याच्या आरोपावरुन विरोधकांनी अब्दुल सत्तार यांना लक्ष्य केले. त्यामुळे अधिवेशनात अब्दुल सत्तार केंद्रस्थानी आरे. त्यानंतर लगेच कृषी प्रदर्शनातील वसुलीच्या आरोपामुळे अब्दुल सत्तार चर्चेत आले. कृषिमंत्री होण्यापूर्वीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचे आरोप झाले होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement