नाशिक36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दिल्ली येथे निदर्शने करीत असलेल्या कुस्तीगीरांना पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक १८ मे संयुक्त निदर्शने करण्याचे आवाहन राज्य कमिटीच्या वतीने करण्यात आले असून भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी देशाच्या अनेक कुस्तीगीर महिलांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या निषेधार्थ दिल्लीच्या जंतर मंतरवर महिला कुस्तीपटूंचे २३ एप्रिल पासून सुरू झालेले बेमुदत धरणे आंदोलन अजूनही सुरूच आहे.
भाजप सरकारने अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. ब्रिजभूषण तसेच हरियाणाचे मंत्री संदीप सिंग यांनाही अटक करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर या खेळाडूंचे म्हणणेही कोणी ऐकून घेतलेले नाही.
भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, आणि दिल्ली येथे निदर्शने करीत असलेल्या कुस्तीगीरांना न्याय मिळवा यासाठी आम्ही कुस्तीगीरांना पाठींबा देण्यासाठी निदर्शने केली याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारीराजेंद्र वाघ व भीमराव दराडे साहेब यांना देण्यात आले
डॉ. डी.एल.कराड ,देविदास आडोळे ॲड.वसुधा कराड ,ॲड. तानाजी जायभावे ,भिवाजी भावले ,संतोष काकडे, तुकाराम सोनजे,सिंधू शार्दूल ,सतीश खैरनार,दगडू व्हडगर ,एकनाथ इंगळे , हिरामण तेलोरे ,सचिन मालेगावकर संतोष कुलकर्णी मोहन जाधव निलेशजाधव मगर भागवत डुंबरे गौतम कोंगळे संभाजी पाटील सुधाकर जाधव विनोद बाविस्कर आर आरआर आर पाटील राकेश पाटील विक्रम तुपे रुपेश सिंग अमित पांडे यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.