पुणे | प्रतिनिधी34 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात मारुती मंदिर चाैक येथे एक तरुण त्याच्या पाळीव कुत्र्याला घेवून त्यास फिरवत असताना एका टाेळक्याने त्याला ‘काय कुत्र्यांना घेवुन फिरताे’ असे बाेलुन शिवीगाळ केली. त्यानंतर झालेल्या वादात टाेळक्याने तरुणास लाेखंडी राॅड, लाेखंडी पाईप, लाकडी बांबुने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रतिक काकडे, सागर गायकवाड, अनिकेत किशाेर खंदारे, शुभम वानखेडे, राेहन काकडे, रामनाथ साेनवणे (सर्व रा.ताडीवाला राेड,पुणे) या सहा आराेपींवर बंडगार्डन पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश कांबळे (वय २८) या तरुणाने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. १५ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता ही घटना घडला आहे.
परिसरात दहशत निर्माण केली
घटनेच्या दिवशी गणेश कांबळे हा त्याच्या पाळीवर कुत्र्याला घेवून फिरवत असताना प्रतिक काकडे या त्याच्या ओळखीच्या तरुणाने त्यास ‘काय कुत्र्यांना घेऊन फिरतो’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यामुळे गणेश याने ‘तु मला का शिवीगाळ करतोस’ अशी विचारणा केली असता आरोपीने त्याला ‘मी कोण आहे, आज तुला दाखवतो’ असे म्हणून इतर साथिदारांसह लोखंडी रॉडने, लोखंडी पाईपने, लाकडी बांबुने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. त्यास वाचविण्यासाठी येणाऱ्या लोकांवरही ही सागर गायकवाड व अनिकेत खंदोरे यांनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप व रॉड त्यांच्या दिशेने उगारले. हे रॉड हवेत भिरकावून जोरजोरात आरडाओरड करुन परिसरात दहशत पसरवली आहे. याबाबत बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत आहे.