नाशिक31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्यातील गड-किल्ल्यांवर, वनविभाग वा गायरान जमिनीवर अतिक्रमण करून इतर धर्मीयांकडून प्रार्थनास्थळे उभारली जातात. नंतर त्याच जागेवर त्या धर्मातील व्यक्तींकडून दावा केला जाताे. हे एकप्रकारचे ‘लँड जिहाद’चे षड्यंत्र असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याचा प्रकारही अशाच उद्देशाने करण्यात आल्याचेही त्यांनी मंगळवारी केलेल्या महाआरतीनंतर सांगितले.
त्र्यंबकेश्वर येथे संदलप्रसंगी धूप दाखविण्याच्या निमित्ताने मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न झाल्यानंतर सातत्याने वाद सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेत हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत महाअारती केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, त्र्यंबकराजाला धूप दाखविण्याची वर्षानुवर्षांची परंपरा अाहे हे सांगणे चुकीचे अाहे. जिहादी विचारांचे ते तरुण टोप्या घालून आले होते त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. गेल्या वर्षी महाविकास अाघाडीचे सरकार असताना ते मंदिरात चार पावले आत आले होते.
बाळासाहेबांचे स्मारकही उभारू शकले नाहीत
संसदेची नवीन इमारत पंतप्रधान मोदींमुळे आकारास येत आहे. त्यांचे कार्य देशासाठी असून स्वतःच्या फायद्यासाठी ‘मातोश्री’ची नवीन इमारत बांधणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासारखे नाही. ठाकरे तर मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकही उभारू शकले नाही, अशीही टीका राणे यांनी केली.