किर्लोस्कर वसुंधरा पर्यावरण चित्रपट महोत्सव: सड्यावरील वैशिष्ट्यपूर्ण जीवसृष्टी धोक्यात, ज्येष्ठ जैवविविधता तज्ज्ञ डाॅ. अपर्णा वाटवे


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Kirloskar Vasundhara Environmental Film Festival I Unique Biodiversity Under Threat I Westlad I Biodiversity Expert Dr. Aparna Watve

पुणे4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मोठे उर्जा प्रकल्प, खाणी, शहरीकरण, अणुउर्जा , कारखाने या साऱ्यातून विकासाचे गाजर दाखवून साम,दाम,दंड,भेद अशी नीती वापरून सडे अधिकृतरित्या बड्या विकसकांच्या हाती दिले जात आहेत, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत प्रसिद्ध जैवविविधता तज्ज्ञ डॉ. अपर्णा वाटवे यांनी व्यक्त केले.

Advertisement

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबतर्फे आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त वाटवे बोलत होत्या.

यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे, महोत्सव संयोजक विरेंद्र चित्राव, आरती कुलकर्णी, स्वप्निल कुंभोजकर, अनुप जयपूरकर आणि माधवी कोलते उपस्थित होते.

Advertisement

तृणधान्यांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहज समृध्दा या संस्थेस ‘वसुंधरा मित्र संस्था’ पुरस्कार, तर फिल्म मेकर’ पुरस्कार डि. डब्ल्यू. इको इंडिया या पर्यावरणविषयक व्हिज्युअल (दृकश्राव्य) मॅगझीनला यांना देण्यात आला.

डॉ. अपर्णा वाटवे म्हणाल्या, सह्याद्रीच्या माथ्यावर आणि कोकणपट्टीत साधारणत: ४-५ कोटी वर्षांपूर्वी सडे तयार झाले आहेत. घाटमाथ्यावरील सडे पाचगणी, महाबळेश्वर, कास, मसाई, आंबोलीचे सडे येथे दिसतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सडे खाडीकाठी तयार झाले आहेत. यावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आणि प्राणी समूह उत्क्रांत झाले आहेत. ते जगात इतर कुठेही दि सत नाहीत. मातीच्या अभावामुळे येथे बारमाही वनस्पती फारशा आढळत नाहीत. शेवाळे, लायकेन, बुरशी, मॉस, नेचे आणि सपुष्प वनस्पतींची जैव-विविधता सड्यांवर दिसते. यात अंदाजे १०० “प्रदेशनिष्ठ” प्रजातींची नोंद झाली आहे. पावसाळ्यात सडयावरील खळग्यांमध्ये पाणी साचून जलवनस्पती, देवभाताचे झुबके वाढतात.

Advertisement

लाखो पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी आणि जांभळी फुले फुलतात. तऱ्हेतऱ्हेच्या माशा, मधमाशा, भुंगे, फुलपाखरे या फुलांना भेट देतात. हे कीटक आजूबाजूच्या फळबागा, भाजीपाला, कडधान्यांच्या पिकालाही बीज निर्मितीत मदत करतात.

कोकणातील “ढोकाचे फुल” आणि घाटमाथ्यावरील “वायतुरा” या सड्यावरील प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा समावेश जागतिक धोकाग्रस्त लाल यादीमध्ये झाला आहे. सडे टिकले तरच या वनस्पती टिकतील.तसेच आंबोली तोड, डोरले पाल असे प्राणीही लाल यादीत नोंदले गेले आहेत. एकूणच सडा हीच एक संकटग्रस्त परिसंस्था किंवा संकटग्रस्त अधिवास आहे, असे म्हणावे लागेल.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement