किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप: म्हणाले- इक्बालसिंह चहल मातोश्रीचे की मुंबई महापालिकेचे आयुक्त? हिसाब तो देना पडेगा…!


मुंबई11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल हे मातोश्रीचे आयुक्त आहेत की मुंबई महापालिकेचे हे अजूनपर्यंत समजलेले नाही. असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इक्बालसिंग चहल यांच्या ईडी चौकशीवरुन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत शिवसेनेला कोंडीत पकडण्याची कयारी केली आहे.

Advertisement

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करत हिसाब तो देना ही होगा म्हणत ईशारा दिला आहे. कोरोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या कोरोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

पेपर दिले नाही

Advertisement

किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. अस्तित्वात नसलेल्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी 5-5 कोविड सेंटर्सचे 100 कोटींचे कंत्राट दिले. मी याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. मात्र मुंबई पोलिसांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हाही दाखल केला होता. मात्र, त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्लाब चहल यांनी 140 दिवस कोणतेही पेपर तपास यंत्रणांना दिलेले नाहीत.

अनेक अधिकारी अडकतील

Advertisement

किरीट सोमय्या पुढे बोलताना म्हणाले, आता चहलको हाजिर होना पडेगा. ते कागदपत्र माझ्याकडे आहेत. इक्बालसिंग चहल यांच्या सहीने हे कंत्राट देण्यात आले होते. हा घोटाळ बाहेर आल्यानंतर यात अनेक अधिकारी अडकतील. लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप त्यांनी केले आहे. हिशोब घेऊनच राहणार मुंबई महापालिका, उद्धव ठाकरे यांचा हिशोब घेऊनच राहणार.

टेंडरमध्ये घोटाळ्याचा सोमय्यांचा आरोप

Advertisement

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन ‘मॅनेजमेंट सर्व्हिस’ या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या निकटवर्तीय कंपनीवर कोरोना महामारीच्या काळात देण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारकडे या प्रकरणाची तक्रार केली होती.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement