किरकोळ वाद: बहिणीच्या भांडणात धावून आलेल्या भावाला मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू


छत्रपती संभाजीनगर44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लहान मुलांचे खेळण्यावरून भांडण झाले. ते महिलांपर्यंत गेले. दरम्यान, आपल्या बहिणीशी भांडणाऱ्या शेजारच्या महिलेला समजावून सांगण्यासाठी पुढे आलेल्या दशरथ अंबादास रोकडे (४०, रा. मोतीवाला कॉलनी) यास संबंधित महिला व इतर तरुणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत दशरथ बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ चिकलठाणा येथील मिनी घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.दशरथ यांच्या घराशेजारीच त्यांची बहीण उषा दीपक हातागळे राहतात. रविवारी उषा यांच्या मुलांशी शेजारील महिलेच्या मुलांमध्ये खेळण्यावरून किरकोळ वाद झाला होता.

Advertisement

यातूनच शेजारील महिला व उषा यांच्यात भांडण सुरू झाले. हा वाद अधिकच वाढत असल्याने मध्यस्थी करण्यासाठी दशरथ पुढे आले. मात्र, रागाच्या भरात असणाऱ्या शेजारची महिला व इतर तरुणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, दशरथच्या छातीमध्ये जोराची लाथ लागल्याने ते खाली निपचित पडले. पुढे त्यांना चिकलठाणा येथील मिनी घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, लवकरच आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दशरथच्या नातेवाइकांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक व्ही.जे. पूर्णपात्रे तपास करीत आहेत. याप्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement