नाशिक31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
उत्तर भारतात थंडीची लाट ही कायम असुन पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशात थंडीसह धुकेही कायम आहे. परंतू महाराष्ट्रात बुधवारी सकाळी ढगाळ वातावरण तयार झाल्याने किमान तापमानात अंशत: वाढ झाली होती. त्यामुळे थंडीची लाट कमी झाली असली तरी वातावरणात गारवा हा कायम होता.
राज्यात गत आठवड्यात थंडीची लाट आल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. तसेच कोकणासह मुंबई शहरातील किमान तापमान हे १५ अंश सेल्सीअसच्या दरम्यान असल्याने मुंबईकर अद्यापही उबदार कपड्याचा वापर करतांना दिसुन येत आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे ७.५,धुळे ८.०, नाशिक १०.५, तर जळगाव १०.८ येथे किमान तापमान हे १० अंशाच्या खाली असुन येथे वातावरणात गारवा कायम आहे, मात्र थंडीची लाट ही कमी झाली आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद येथे ९.७ अंश सेल्सीअसची नोंद करण्यात आली आहे.
असा रहाणार अंदाज
२० ते २६ जानेवारी दरम्यान पुन्हा नव्याने अफगाणीस्थानच्या दिशेने दोन पश्चिमी चक्रावात येणार आहे. त्यामुळे या चक्रावाताचा २३ ते २५ जानेवारी दरम्यान पुन्हा वातावरणावर परिणाम जाणवणार आहे. तसेच दोन दिवसात थंडीचे प्रमाण हे कमी रहाणार असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.
असे होते राज्यातील किमान तापमान
निफाड ७.५, धुळे ८.०, औरंगाबाद ९.७, नाशिक १०.५, जळगाव १०.८, बारामती ११.६, अहमदनगर १२.०, सातारा १२.०, महाबळेश्वर १३.४, मालेगाव १४.२, उस्मानाबाद १४.४, डहाणु १४.४, सांगली १४.८,परभणी १५.०, मुंबई १५.५,सोलापुर १५.६, बीड १६.०, ठाणे १९.०