प्रतिनिधी | अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
कर्नाटकमधील विजयाचा आनंद साजरा करताना काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. काँग्रेसने कर्नाटकमध्ये जोरदार मुसंडी मारली असून, स्वबळावर सत्ता स्थापन करेल असे चित्र निर्माण झाले आहे. त्याच विजयाचे शहरासह जिल्हा काँग्रेसच्या वतीने राजकमल चौकात विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि काँग्रेसचा जयघोष यामुळे राजकमल चौकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कर्नाटकमधील नागरिकांनी भाजपच्या खोट्या प्रचाराचा सुपडा साफ केला आहे. जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका, त्याचप्रमाणे जनकल्याणकारी पाच महत्त्वपूर्ण विषयांचे आश्वासन राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व स्थानिक नेतृत्वांनी दिली होती. त्याच्याच समर्थनार्थ कर्नाटकातील जनतेने स्पष्ट बहुमत देऊन काँग्रेस पक्षाला मते देऊन विजयाचा राजमार्ग प्रशस्त केला. पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण निवडणूक धार्मिक प्रचारावर केंद्रित करण्याचा डाव जनतेने सपशेल हाणून पाडला असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटले.
माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश चिटणीस असिफ तवक्कल, संजय वाघ, भालचंद्र घोंगडे, डॉ.अंजली ठाकरे, जयश्री वानखडे, प्रदीप हिवसे, शोभा शिंदे, आशा अघम, किरण साऊरकर, रफिक चिकुवाले, हाजी नजीर खान, फिरोज खान, राजेंद्र शेरेकर, अभिनंदन पेंढारी, अब्दुल रफिक, महेश व्यास, मुकेश छांगानी, जावेद साबीर, यासिर भारती, नीलेश गुहे, अनिकेत ढेंगळे, वैभव देशमुख, समीर जवंजाळ, संकेत कुलट, संकेत साहू, गुड्डू हमीद, पंकज मांडळे आदी उपस्थित होते.