कारवाई: पुण्यात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेला मुंबईतील तरुण जेरबंद, 11 लाखांचे मेफेड्रोन जप्त


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मुंबई येथून मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्रीसाठी पुणे शहरतील कर्वे रस्त्यावर आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ११ लाख रुपय किमतीचे ५५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

Advertisement

आरोपी संकल्प सुरेश सकपाळ (वय ३३, रा. बीडीडी चाळ, जी. एम. भोसले मार्ग, वरळी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डेक्कन जिमखाना परिसरात एक संशयित अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी संदीप शेळके, योगेश मांढरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कर्वे रस्त्यावरील सेंट क्रिस्पिन्स हाेमजवळ फूटपथावर सापळा लावला. संबधित वेळी सकपाळ त्याठिकाणी आला. त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सकपाळला पकडले. त्याच्या अंगझडती दरम्यान ११ लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सकपाळ याच्या विरुद्ध डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात एनडीपीसी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा परिसरात एक जण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ पथकाच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शाहरुख मुस्तफा बेग (वय -२१, रा. आंबेडकरनगर, कोंढवा,पुणे) याला ताब्यात घेतले. बेग याच्याकडून एक लाख ४० हजार रुपयांचे मेफेड्रोन, ८१ हजार रुपयांचे चरस जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, शुभांगी नरके, योगेश मांढरे, संदीप शेळके, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, संदीप जाधव आदींनी ही कारवाई केली आहे.

Advertisement



Source link

Advertisement