कारवाई: पुणे पोलिसांकडून 12 लाख रूपयांचा 63 किलो गांजा जप्त, दोन संशयितांना घेतले ताब्यात


पुणे9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पथकाने बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दोन संशयित व्यक्तींना पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल गेट समोर पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून पोलीसांनी तब्बल १२ लाख ७३ हजार रुपये किंमतीचा ६३ किलो ६९४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ,दोन मोबाईल, तीन बॅगा, असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे यांनी दिली आहे. पोलिस अंमलदार याेगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

याप्रकरणी मंतू रामबाबू राय (वय-३०,रा.जोरपुर, जि. समस्तीपुरा, बिहार) व राकेश कुमार रामनाथ दास (वय-१९,रा.खुसरुपुर, जि.पटना, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपसी अ‌ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, एएसआय एस घुले, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, संतोष देशपांडे, प्रशांत बोमदांडी, संदीप जाधव, महेश साळुंखे, साहिल सय्यद शेख, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बस्तेवाड यांनी केली आहे.

गांजासह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Advertisement

पिंपरी चिंचवड पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस भोसरी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालताना, पोलीस अंमलदार विजय दाैंडकर व प्रसाद कलाटे यांना मिळालेल्या माहिती आधारे, भाेसरीतील लांडगेनगर येथे एका खोलीवर पोलीसांनी छापा टाकून एक लाख रुपये किंमतीचा माेबाईल, ५० हजार रुपये किंमतीचा दोन किलो गांजा, ३६ हजार रुपये रोख असा एकूण एक लाख ८६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संगिता निवृत्ती जेधे (वय-४०) व अमर निवृत्ती जेधे (२८, दोघे रा.भाेसरी,पुणे) या आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Advertisement