कारवाई: पाणठेल्यावर उभ्या असलेल्या 2 पोलिस मित्रावर गुंडांचा हल्ला; एका जणाचा मृत्यू; फरार आरोपींना पुण्यातून अटक

कारवाई: पाणठेल्यावर उभ्या असलेल्या 2 पोलिस मित्रावर गुंडांचा हल्ला; एका जणाचा मृत्यू; फरार आरोपींना पुण्यातून अटक


नागपूर17 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गुंडाने केलेल्या हल्ल्यात राकेश मिश्रा नावाचा पोलिस मित्र ठार झाल्याची घटना बुधवार दि. 16 ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेने खळबळ माजली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या यूनिट क्र. एकने पुण्यातून पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये बरहा, आमिर, शिनु शिंदे, मानकर व पियूष वर्मा (तिघेही यवतमाळ) यांचा समावेश आहे.

Advertisement

पानटपरी उभ्या असलेल्या दोघांवर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी रवि बच्चन जैस्वाल (वय 25) व मृतक राकेश चंद्रकांत मिश्रा (वय 32) हे दोघेही एमआयडीसी पोलिस ठाण्यातंर्गत राजीव नगरमधील राजकुमार जैसवार याच्या पानठेल्यावर बसलेले असताना आरोपी अर्जुन रामा दांडेकर व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी जुन्या भांडणाचे निमित्त करून दोघांवरही चाकू व तलवारीने जीवघेणा हल्ला केला.

Advertisement

एकाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेले. यातील जखमी राकेश मिश्रा याला पडोळे हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले असताना डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. जखमी फिर्यादी रवि बच्चन जैस्वाल याच्या लता मंगेशकर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पोलिस फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या यूनिट क्र. ३ ने सुरू केला होता.

Advertisement



Source link

Advertisement