पुणे4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
लोणावळा परिसरात जुने पुणे-मुंबई रस्त्यावर मळवली, कार्ला, भाजे परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. शनिवार-रविवाारी सुट्टीचे दिवशी मोठ्या प्रमाणात सदर भागात पर्यटक येत असल्याचा गैरफायदा घेत भाजे व लोणावळ्यातील मनशक्ती केंद्र, वरसोली परिसरातपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या कारच्या काचा फो़डून गाडीतील मौल्यवान बॅगातील रोख रक्कम, मोबाईल व इतर ऐवज अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याचे दोन तक्रारी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्याचा तपास करत पाेलीसांनी सदर अाराेपींना जेरबंद केले अाहे.
अखिल सलीम व्हाेरा (वय-३२,रा.अानंद, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक इनोव्हा कार, सीमकार्ड नसलेले एकूण सहा मोबाईल, पाच पर्स, दोन बॅगा, दाेन पाॅवर बँक, दाेन घडयाळे, राेख २३ हजार रुपये असा एकूण 12 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला अाहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांचे कार फाेडून चाेऱ्या हाेत असल्याचे अनुषंगाने पाेलीसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी फुटेज मध्ये एक संशयित इनाेव्हा कार व त्यातील ३० ते ३५ वयाेगटातील पर्यटकांचे कारचे काचा फाेडून चाेरी करताना दिसून आले.
त्यानुसार पोलिसांनी संबंधित कारचा शोध सुरु केला असता, कार्ला, भाजे, मळवली, वरसाेली अादी भागात पाेलीस काळया काचा असणारी संशयित टाेयाटाे कंपनीची इनाेव्हा कार (जीजे ०६ एफसी ३८०६) ही भाजे धबधबा परिसरात दिसून अाली. त्यानुसार पाेलीसांनी सापळा रचून कारचालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली तसेच कारची झडती घेतली. त्यावेळी अखिल व्हाेरा या अारेपीचे गाडीत चाेरीचा मुद्देमाल मिळून अाला. त्याचे विराेधात लाेणावळा ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अालेला अाहे. अाराेपीला न्यायालयात हजर केले असता, २२ अाॅगस्ट पर्यंत पाेलीस काेठडी मिळाली अाहे. अाराेपीने यापूर्वी देखील लाेणावळा शहर, कामशेत परिसरात अशाप्रकारचे गुन्हे केलेले असून त्याबाबत सखाेल तपास करण्यात येत अाहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, अपर पाेलीस अधीक्षक मितेश घट्टे, सहा.पाेलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, वपाेनि किशाेर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपाेनि निलेश माने, पाेउपनि भारत भाेसले, सहा.फाैजदार युवराज बनसाेडे, पाेलीस हवालदार नितेश कवडे, गणेश हाेळकर, बाळकृष्ण भाेईर, विजय मुंढे यांचे पथकाने केली अाहे.