कारवाई: कराडच्या प्रांत कार्यालयातील दोन कंत्राटी लिपिकांना 20 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Two Contract Clerks In Karad’s Provincial Office Were Caught Red handed While Accepting A Bribe Of 20 Thousand; Anti corruption Department Action

सातारा6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भूसंपादन मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता 20 हजाराची लाच स्वीकारताना कराड प्रांताधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागातील दोन कंत्राटी लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रामचंद्र श्रीरंग पाटील आणि दिनकर रामचंद्र ठोंबरे, अशी लाचखोरांची नावे आहेत. पोyfस उपअधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य यांनी ही कारवाई केली.

Advertisement

तक्रारदार हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेचा शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यासाठी येरवळे (ता. कराड) गावातील नऊ शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेतलेले आहे. तक्रारदार हे कराड प्रांत कार्यालयात मूल्यांकन प्रक्रियेच्या पाठपुराव्यासाठी गेले असता दोन कंत्राटी लिपिकांनी प्रत्येकी 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.

लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. १६ आणि १७ मे रोजी पडताळणी केली. त्यामध्ये दोन्ही लिपिकांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज (शुक्रवारी) पोलीस निरीक्षक विक्रम पवार, सहायक फौजदार शंकर सावंत, पोलीस नाईक नीलेश राजपूरे, विक्रमसिंह कणसे यांच्या पथकाने सापळा रचून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना कंत्राटी लिपिकांना रंगेहाथ पकडले.

Advertisement

रामचंद्र पाटील आणि दिनकर ठोंबरे हे कराड प्रांत कार्यालयातील भूसंपादन विभागात दीर्घकाळ कार्यरत होते. भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या प्रशासकीय कामाचा दोन्ही लिपिकांना दीर्घ अनुभव होता. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पाटील आणि ठोंबरे यांना कंत्राटी लिपिक म्हणून कामावर घेण्यात आले होते.Source link

Advertisement