कारवाई: अकोला दंगलीप्रकरणी आरोपी अरबाज खानला अटक; वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्यासह जमाव जमवल्याचा गंभीर ठपका


अकोला18 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अकोला दंगली प्रकरणी पोलिसांनी अरबाज खान नामक एका आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. या आरोपीने इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून जमाव गोळा केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Advertisement

अकोला शहरातील हरिहरपेठ भागात नुकतीच 2 गटांत मोठी दंगल उसळली होती. त्यात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. दंलखोरांनी काही ठिकाणी जाळपोळही केली. या घटनेत 1 जण ठार, तर 10 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी तपासात एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे ही दंगल भडकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अरबाज मुख्य आरोपी

Advertisement

अकोल्यात ज्या पोस्टमुळे दंगल उसळली ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप अरबाज खानवर आहे. एवढेच नाही तर रामदास पेठ पोलिस ठाण्यात जमाव जमवण्यातही या आरोपीचा हात आहे. याच जमावाने नंतर शहरात अनेक ठिकाणी हिंसाचार केला. पोलिसांच्या मते, अरबाज या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी या प्रकरणी गंगानगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक केली आहे. त्याच्यावरही इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अरबाज खानच या प्रकरणातील मुख्य तक्रारदार होता. तक्रार दाखल केल्यानंतर तो फरार झाला. त्यानेच वादग्रस्त पोस्ट एका विशिष्ट समुदायाच्या ग्रुपवर व्हायरल केली. पोलिसांनी ज्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून वादग्रस्त चॅटिंग झाले, त्या अकाउंटच्या वापरकर्त्यालाही ताब्यात घेतले आहे. दंगलीच्या 6 व्या दिवशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Advertisement

कोण आहे अरबाज खान?

  • धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणारा मुख्य तक्रारदार.
  • व्हीएफएक्स अॅनिमेशन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. मुंबईत शिकतो.
  • अकोल्यातील मोहता मिल भागात राहतो.

काय आहेत आरोप

Advertisement
  • अरबाज खानवर रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार देताना बेकायदा जमाव जमवल्याचा आरोप आहे.
  • याशिवाय अरबाजनेच इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त चॅटिंग व्हायरल केल्याचा आरोप आहे.

अकोला दंगल:दंगलग्रस्तांनी सांगितली आपबीती; दंगलखोरांनी पिशवीत दगड आणले होते, हाती शस्त्रे; दार बंद केल्याने बचावलो

दंगलखाेरांनी साेबत दगड अाणले होते. हातात शस्त्रे होती. फटाके फाेडत इंधनाचे कापडी बाेळे फेकले. मुख्य दाराला लाथा मारल्या.. घराच्या मागील बाजूने घुसण्याचा प्रयत्न केला… मात्र, सुदैवाने यश आले नाही… आम्ही दार बंद करूनच बसलाे… खिडकीच्या फटीतून डाेकावून बाहेर पाहिल्यानंतर बाहेरील हिंसेने थरकाप उडला… अशा शब्दांत जुने शहरातील दंगलग्रस्तांनी अापबीती सांगितली. दंगलखाेरांनी निर्माण केलेली दहशत सांगतांना त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती दिसून येत हाेती.

Advertisement

जुने शहरातील पाेळा चाैक, हरिहर पेठ, गाडगेनगर या भागात दंगल पीडितांच्या म्हणण्यानुसार दंगलखाेर जुने शहर पाेलिस स्टेशनकडून हरीपेठकडे जात हाेते. त्यांनी आमच्या घरांवर जाेरात दगडफेक केली. दगडं त्यांनी साेबत एका माेठ्या पिशवीत आणले हाेते. हातात धारदार शस्त्र, पाइप हाेते. घरांवर दगडफेक केली. खिडक्यांच्या काचा फुटल्या. दगड घरातही अाले. घरातील साहित्याचे नुकसान झाले. आमच्या घराबाहेरील वाहने पेटवून देण्यात अाली. वाहनांची ताेडफाेड केली, असेही काहींनी सांगितले. पाच जणांनी आपली अापबिती सांगितली. येथे वाचा संपूर्ण बातमी…



Source link

Advertisement