कारवाईचा इशारा: बोगस बियाणे, खते देत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला तर त्यांना सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई11 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बोगस बियाणे, बोगस खते जर कुणी देत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला तर त्यांना सोडणार नाही. पाऊस जर पुढे सरकला असेल तर कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कृषी आणि सहकार विभागाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा आहे, खरीप हंगाम अतिशय चांगला जावा, त्यासाठी बियाने, खते मुबलब प्रमाणात मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

आजवरचे सर्व रेकॉर्ड तुटतील

Advertisement

देशातील 140 कोटी जनता देशात हुकुमशाही आहे की नाही, हे ठरवेल. जनतेला माहिती आहे कि मागच्या 60 वर्षांत देशाला कुणी लुटले आहे. आणि मागील 9 वर्षात देशाचा किती विकास झाला आहे. 70 वर्षांत जे झाले नाही ते मोदींनी 9 वर्षांत करुन दाखवले. 2024 मध्ये आतापर्यंत जे कुणाला जमले नाही तशी कामगिरी मोदींच्या नेतृत्वात होईल. अशा प्रकारे अनेक पक्षाने एकत्र येण्याचा प्रयत्न केला मात्र, अशा बैठकांना काही होणार नाही, असे मत उद्धव ठाकरेंच्या आणि केजरीवाल भेटीवर मत व्यक्त केले आहे.

विमा कंपनीकडून अडवणूक होणार नाही

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी 1 रुपयात पिकविमा आणला आहे. सततच्या पावसामुळे नुकसान भरपाईचा निर्णय असो की शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा भासणार नाही. या सर्वांचे नियोजन करण्यात आले आहे. येणार खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना उत्तम जाईल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

तर बँकेवर कारवाई

Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या बॅंका आपल्या जबाबदारीने वागणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणार नाही त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. यावेळी आम्ही सरकार स्थापन केले आहे, पावसाचा अंदाज चुकणार नाही असे मिश्कील टीपण्णीही त्यांनी केली आहे.

पंतप्रधानाचे केले कौतुक

Advertisement

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 11 व्या स्थानावरुन 5 व्या नंबरवर देशाला आणण्याचे काम त्यांनी केले आहे. हे सर्वांना माहिती आहे. जगभरात त्यांच्या कामामुळे देशाचे नाव होत आहे. जनतेला माहिती आहे की देशाच्या प्रगतीसाठी चांगले निर्णय घेतले आहे.Source link

Advertisement