कारखाने अधिनियमानुसार वार्षिक विवरण पत्रक भरणे बंधनकारक: औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक आडे यांचे प्रतिपादन


नाशिक7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कारखाने अधिनियम 1948 नुसार वार्षिक विवरणपत्रकाबद्दलची वास्तविक माहिती भरून सादर करणे हे संबधित उद्योगांना बंधनकारक आहे. तसेच वार्षिक विवरणपत्रक भरण्यासाठी प्रत्येक उद्योगांना आवश्यक सहकार्य संचालयातर्फे करण्याचे आश्वासन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक अंजली आडे यांनी दिले. याचबरोबर विवरणपत्रक भरण्यासाठी आवश्यक दस्तऐवज व वार्षिक विवरण पत्रक भरण्यासंदर्भात सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.

Advertisement

शासनाच्या कारखाने अधिनियम 1948 नुसार वार्षिक विवरणपत्रकाचे मार्गदर्शन करण्यासाठी सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य नाशिक व निमा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन निमा हाऊस सिन्नर येथे करण्यात आले होते. निमाचे आशिष नहार, किशोर राठी, सुधीर बडगुजर, एस के नायर आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

आशिष नहार यांनी निमा मार्फत आयोजित होत असलेल्या उपक्रमाची माहिती देत सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य यांना आपल्या उद्योगाची माहिती देणे फार महत्वाचे असल्याचे नमूद करत यामुळे आपल्या उद्योगात अपघातांचे प्रमाण कमी होण्याबरोबरच कामगारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते असे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

याच बरोबर किशोर राठी यांनी आलेल्या सर्व व्यवस्थपकांचे स्वागत करत भविष्यात अनेक चांगले उपक्रम निमाच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न नवीन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली.

कारखाना म्हणजे काय, कारखान्यात कायम स्वरूपी, ठेकेदार कामगारांची संख्या व त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, सरासरी अपघातांचे प्रमाण व अपघातांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या उपाययोजना, पगार, सुट्ट्या, आरोग्य तपासणी व इतर गोष्टींची कशा पद्धतीने नोंद करणे आवश्यक आहे. कारखाना नोंदणी क्रमांक, वास्तुनिर्मिती प्रक्रिया, धोकादायक व अतिधोकादायक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात देण्यात येणाऱ्या सुरक्षा, कारखान्याचा नकाशा मान्यतेचा दिनांक, कारखान्यात वर्षात होणारे पायाभूत व कामगार बदल याची सविस्तर माहिती वार्षिक विवरण पत्रक क्रमांक 27 मध्ये भरण्याची तसेच विवरण पत्रक संचालनायच्या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याची माहिती अंजली आडे यांनी दिली. सूत्रसंचलन राहुल शुक्ला व आभार प्रदर्शन आशिष नहार यांनी केले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement