कापूस व्यापार्‍याचे रोख रक्कम लंपास प्रकरण: कार अडवून 27 लाख 50 हजार लंपास केल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला कोठडी


छत्रपती संभाजीनगर9 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कापूस व्यापार्‍याची कार अडवून पिस्तुलचा धाक दाखवून, काठीने कारच्‍या काचा फोडत, मारहाण करुन 27 लाख 50 हजारांची रोख रक्कम लंपास केल्याप्रकरणी तीसर्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. देविदास शामलाल रोरे (40 रा. हनुमान मंदीराच्‍या बाजुला, गांधेली ता.जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव असून त्‍याला 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांनी दिले.

Advertisement

प्रकरणात साईनाथ मनोहर तायडे (54, रा. देवळी, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादी हे कापसाचे व्यापारी आहेत. परराज्यात विक्री केलेल्या कापूस व्यापार्‍याचे हवाल्यामार्फत आलेली रक्कम घेण्यासाठी ते गोमटेश मार्केट येथील दुकानात आले होते. 27 लाख 50 हजारांची रक्कम त्यांनी बॅगेत ठेवून ते चालक भुसारीसोबत कारने (एमएच 20 सीएस 3915) लासूरच्या दिशेने निघाले होते. करोडी नाक्याजवळून ते जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. पिस्‍तुलचा धाक दाखवत, काठीने कारच्‍या काचा फोडून, मारहाण करित कारमधील रोख रकमेची बॅग घेऊन पळ काढला. प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्यात यापूर्वी दिपक बर्डे आणि प्रविण राऊत या दोघा आरोपींना अटक करण्‍यात आली. आरोपी दिपक बर्डे याच्‍याकडून चार लाख रूपये, गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाइल तर प्रविण राऊत याच्‍याकडून एक लाख रुपये, गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाइल असा सुमारे 6 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज आणि गुन्‍ह्यात वापरलेली काठी जप्‍त करण्‍यात आली. आरोपी बर्डे याने हेमंत वाघ आणि देविदास रोरे यांच्‍या साथीने गुन्‍हा केला, तसेच हेमंत वाघ याने पिस्‍तुलचा दाखविल्याचे कबुल केले. त्‍यानूसार पोलिसांनी आरोपी देविदास रोरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Advertisement

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सराकरी वकील जयमाला राठोड यांनी आरोपींकडून गुन्‍ह्यातील उर्वरित 22 लाख 50 हजारांची रक्कम हस्‍तगत करायची आहे. गुन्‍ह्याता वापरलेली पिस्‍तुल जप्त करायची आहे. गुन्‍ह्यात पसार आरोपी हेमंत वाघ याला अटक करायची आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement