काठमांडू विमान अपघातात 68 प्रवाशांचा मृत्यू: भारतीय संघाचा श्रीलंकेवर मोठा विजय, सुधीर तांबेंचे काँग्रेसमधून निलंबनएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नमस्कार, आज सोमवार 16 जानेवारी असून, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी

Advertisement

पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी….

काठमांडू विमान अपघातात 68 प्रवाशांचा मृत्यू

Advertisement

नेपाळच्या पोखरामध्ये रविवारी सकाळी 11 वाजता यती एअरलाइन्सच्या 72 आसनी विमान अपघातात 68 जणांचा मृत्यू झाला. या विमानात 10 विदेशींसह 68 प्रवासी व 4 क्रू मेंबर होते. ज्यामध्ये 5 भारतीय देखील दगावले आहेत. जळत्या विमानातून दोघांना बाहेर काढण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित दोघांची माहिती मिळू शकली नाही. वाचा सविस्तर

भारतीय संघाचा श्रीलंकेवर सर्वात मोठा विजय

Advertisement

टीम इंडियाने तिसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेवर 317 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. तीन एक दिवसीय सामन्यांच्या या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप देत ही मालिका 3-0 ने जिंकली. वनडेच्या 52 वर्षांच्या इतिहासात टीम इंडिया 300+ धावांच्या फरकाने विजय मिळवणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. भारताने आपल्या 1023 व्या वनडे सामन्यात ही कामगिरी केली. शेवटच्या सामन्यात भारताने 390 धावा केल्या. वाचा सविस्तर

सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

Advertisement

नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरणाऱ्या डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डॉ. तांबे यांच्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी निलंबनाची कारवाई केली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी कारवाईची घोषणा प्रसिद्धिपत्रकाद्वारे रविवारी केली. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. वाचा सविस्तर

अफगाणी चक्रवातामुळे राज्य आणखी गारठणार

Advertisement

राज्यात रविवारी किमान तापमानाच्या सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सियसने घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबई कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. शनिवारपासून राज्यात गार वारे वाहत असल्याने दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे. तसेच आगामी 18 जानेवारीपर्यंत किमान तापमानात घसरण होण्याचा अंदाज असल्याने तीन दिवस राज्यात थंडीचा कडाका राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. वाचा सविस्तर

ऋषभ पंतवर 6 आठवड्यांत दुसरी शस्त्रक्रिया हाेणार

Advertisement

टीम इंडियाचा विकेटकिपर बॅट्समन ऋषभ पंत कारच्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्यावर आता दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पंतवर सहा आठवड्यांत त्याच्यावरील ही दुसरी शस्त्रक्रिया असणार आहे. यातून त्याला जवळपास 18 महिन्यांपर्यंत विश्रांती घ्यावी लागणार आहे. ऋषभ पंतचा विश्वचषकातील सहभाग अनिश्चित आहे. त्याला पूर्णपणे सावरण्यासाठी दीड वर्षाचा काळ लागणार आहे. वाचा सविस्तर

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement