इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये यावर्षी १० संघ खेळत असून लीगची सुरुवात शानदार झाली आहे. लीगचा १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर गुरुवारी (७ एप्रिल) खेळला गेला. हा सामना लखनऊने ६ विकेट्सने जिंकला. सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर यांनी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याचे कौतुक केले आहे.
अजित आगरकर म्हणाले की, “पंत सामना चांगल्या पद्धतीने समजून घेतो, ज्यामुळे तुम्ही खेळ विकसित करण्याच्या पद्धती आणि युवा खेळाडू म्हणून केलेल्या अनेक प्रगती पाहू शकता. एका युवा खेळाडूच्या रुपात त्याने कमी काळात जी प्रगती केली आहे, ती त्याला चांगला कर्णधार बनवतो.” दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॅाटसन म्हणाला, “रिषभ पंत ज्या पद्धतीने पुढे जात आहे, खेळाची स्थिती कशी ही असली तरी तो खेळ समजून घेऊन खेळतो. हा त्यावेळचा सर्वात रोमांचक भाग असतो.”
१९ वर्षाखालील विश्वचषकाचा विजेता कर्णधार यश धूल म्हणाला, “सर्वात महत्त्वाचं रिषभ पंत खूप शांत आहे आणि तो खेळ चांगल्या पद्धतीने समजतो. तो आपल्या खेळाच्या सर्व क्षणांमध्ये आपल्या शाॅटची निवड करु शकतो.” रिषभ पंतने आपल्या आयपीए कारकिर्दीत ८७ सामन्यांत ३५. ३६ च्या सरासरीने २५८१ धावा केल्या आहेत, यामध्ये एका शतकाचा आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. रिषभ पंत कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करत आहे, पहिल्या सामन्यात लखनऊला गुजरातने ५ विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर लखनऊने सीएसकेला ६ विकेट्सने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला संघाने १२ धावांनी पराभूत केले आणि गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनऊने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केले.
रिषभ पंत म्हणाला की, एक बॅटिंग युनिट म्हणून आपल्याला स्वतःला सुधारण्याचे मार्ग शोधावे लागतील. गेल्या दोन-तीन सामन्यांमध्ये आम्हाला एक ‘पॅटर्न’ दिसतोय, आम्ही सातत्याने विकेट्स गमावणार नाही आणि मधल्या ओव्हर्समध्ये कमी ‘डॉट’ बॉल्स खेळू नयेत यावर काम करायला हवे. चेंडू चुकवल्याने इतर फलंदाजांवर दबाव वाढतो.
गुरुवारी लखनौ सुपर जायंट्सकडून सहा विकेट्सने पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने सांगितले की, “आम्ही स्पर्धेत पुढे जाताना या गोष्टींवर काम केले तर आम्ही चांगली कामगिरी करू शकतो.