औरंगाबाद5 मिनिटांपूर्वी
Advertisement
- कॉपी लिंक
औरंगाबाद रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वरून निघालेल्या सचखंड एक्स्प्रेससमोर उडी घेत सीआयडीतील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजता घडली. अनिल सोनवणे (४२, रा. एन -६ सिडको) असे त्यांचे नाव असून ते राज्य गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद येथे शिपाई म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांची नेमणूक अनुकंपावर वडिलांच्या जागी सन २०१८ मध्ये झाली होती. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Advertisement
बातम्या आणखी आहेत…
Advertisement