‘करून दाखवलं’ हे वाक्य सार्थ करत धोनीने चेन्नई सुपर किंगचा पराभव लांबवला

चेन्नई सुपर किंग
चेन्नई सुपर किंग

१३२ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची दमछाक झाली. सहा गडी राखत अय्यर ब्रिगेडने विजय मिळवला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं कोलकाताच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी कडक रिप्लाय देत धावा सहज करण्याचे संकेत दिले. पण चेन्नईचा नवा कर्णधार रविंद्र जडेजाने चेंडू ब्रावोच्या हाती सोपवला आणि चेन्नईला पहिलं यश मिळाले.
ब्रावोनं व्यंकटेश अय्यराला १६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. एवढ्यावर तो थांबला नाही तर नितीश राणालाही त्याने बाद केले. या दोन्ही विकेट्स घेतल्यानंतर ब्रावोने नव्या अंदाजात आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या अधिकृत अकाउंटवरुन ब्रावोच्या नव्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. न्यू सेशन न्यू सेलिब्रेशन या कॅप्शनसह शेअर केलेला व्हिडिओला अल्पावधीत चांगली पसंती मिळताना दिसते.
कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात कमाल दाखवून दिली. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने चेन्नई सुपर किंग्सची कोंडी केली. सीएसकेचा निम्मा संघ त्यांनी ६१ धावांवर माघारी पाठवून सामन्यावर पकड मजबूत केली. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी व कर्णधार रवींद्र जडेजा हे खेळपट्टीवर असूनही फार कमाल दाखवू शकले नाही. केकेआच्या गोलंदाजांना त्याचे श्रेय द्यायला हवे. त्यांनी चेन्नईच्या धावांवर लगाम लावला. पण, धोनीने दोन वर्षांनंतर पहिले अर्धशतक झळकावताना सीएसकेची लाज वाचवली.

मागील हंगामात ऑरेंज कॅप मिळवणारा ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कोणताही फलंजाद मैदानावर जास्त वेळ तग धरू शकला नाही. ऋतुराजनंतर ड्वेन ब्रव्होच्या रुपात चेन्नईला २८ धावांवर दुसरा झटका बसला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मैदानावर लय सापडण्याआधीच उथप्पाला वरुण चक्रवर्तीने २८ धावांवर बाद केले. त्यानंतर ६१ धावा होईपर्यंत चेन्नईचे पाच गडी बाद झाले. अंबाती रायडू १५ धावांवर बाद झाला. तर शिवम दुबे अवघा ३ धावा करुन तंबूत परतला.
आजवर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात वयस्कर भारतीय फलंदाजाने हे अर्धशतक झळकावले होते. याचा अर्थ धोनी हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वाधिक वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे.

आय पी एल लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या उमेश यादवने कमाल करत सामनावीराचा पुरस्कार पटकावत सिद्ध केले.

Advertisement