अकोला9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
महानगरपालिका क्षेत्रामध्ये थकित मालमत्ता कर धारकांवर मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्या आदेशान्वये आणि कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात सील लावण्याची कारवाई सुरू आहे. गुरुवारी 19 जानेवारी रोजी पाच व्यावसायीकांच्या गोडावूनला सिल करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गट क्रं. सी-6, मालमत्ता क्रं. 248, धारक कृषी उत्पन्न बाजार समिती भोगवटादार नारायण अॅण्ड कंपनी यांच्याकडे 2017-18 ते 2022-23 पर्यंतचा 1 लाख 90 हजार 986 रुपये, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गट क्रं. सी-6, मालमत्ता क्रं. 251, धारक कृषी उत्पन्न बाजार समिती भोगवटादार बंसल इंडस्ट्रीज यांच्याकडे 2017-18 ते 2022-23 पर्यंतचा 1 लाख 31 हजार 504 रुपये, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गट क्रं. सी-6, मालमत्ता क्रं. 237, धारक कृषी उत्पन्न बाजार समिती भोगवटादार अनिल ट्रेडिंग कंपनी यांचेकडे 2017-18 ते 2022-23 पर्यंतचा 2 लाख 30 हजार 642 रुपये, टिळक रोड येथील पी.एच.मार्केट मधील गट क्रं. सी-3, मालमत्ता क्रं. 741, धारक पुनमचंद व हंसराज शर्मा यांच्याकडे 2017-18 ते 2022-23 पर्यंतचा 2 लाख 27 हजार 372 रुपये, टिळक रोड येथील पी.एच.मार्केट मधील गट क्रं. सी-3, मालमत्ता क्रं. 645, भोगवटादार महेश मोटवानी यांच्याकडे 2017-18 ते 2022-23 पर्यंतचा 2 लाख 99 हजार 888 रुपये मालमत्ता कर थकीत होता.
थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना देवूनही थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने महापालिका मालमत्ता विभागाच्या वतीने या मालमत्तांना सिल लावण्यात आले. ही कारवाई क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, सहा.कर अधिक्षक हेमंत शेळवणे, अविनाश वासनिक, दिलावर खान, राकेश शिरसाट, मोहम्मद अजहर, मोहन घाटोळ, अनिल नकवाल, संदीप जाधव, चंदू मुळे, सुरक्षा रक्षक जय गेडाम, कल्पना उपरवट यांनी केली.
दरम्यान थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई तीव्र गतीने सुरु आहे. ज्या नागरिकांकडे तसेच व्यावसायीकांकडे मालमत्ता कर थकीत आहे. त्यांनी आपल्या थकीत कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे तसेच जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.