कपड्याची बॅग भरूनच नितीन देशमुख ACB च्या दारी: अटकेची शक्यता केली व्यक्त; सुखरूप येण्यासाठी पत्नीने केले औक्षण


अकोला28 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गुवाहटीतून सुटका करून घेत सहीसलामत आलेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आज सकाळी दहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थातच ‘एसीबी’च्या चौकशीसाठी अकोल्यातून अमरावतीला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

Advertisement

देशमुख सुखरूप परत यावे म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना ओवाळले. आपल्याला अचानक अटक झाली, तर गैरसोय नको म्हणून त्यांनी कपडे भरलेली एक बॅग सोबत नेली. त्यांच्यासोबत जवळपास सातशे ते आठशे कार्यकर्ते अमरावतीकडे रवाना झाल्याचे समजते. या प्रकरणी कथित तक्रारदाराची आणि मुख्यमंत्र्यांच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप आपल्याकडे असल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.

काय म्हणाले देशमुख?

Advertisement

चौकशीला जाण्यापूर्वी नितीन देशमुख म्हणाले की, मागे मी सुरतला गेलो होतो. मात्र, त्यावेळी माझ्याकडे कपडे नव्हते. एकाच ड्रेसवर मला माघारी परतावे लागले होते. आज मला अटक होण्याची शक्यता वाटते. हे पाहता मी त्याच तयारीने निघालो आहे. कोणतीही कारवाई करू द्या. माझी तयारी झालीय. हे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालले आहे.

नोटीसमध्ये काय?

Advertisement

आमदार नितीन देशमुख यांना ‘एसीबी’ने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, आपल्याविरुद्ध उघड चौकशी क्रमांक ईऔ/46/अकोला/2022 अन्वये आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परीक्षेत्रात अमरावती येथे सुरू आहे. या चौकशीबद्दल आपले बयान नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण 17 जानेवारी सकाळी 11 वाजता अपर पोलिस अधीक्षक कार्यालय लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अमरावती येथे उपस्थित राहावे.

तिसरे आमदार

Advertisement

विशेष म्हणजे यापूर्वी ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनाही ‘एसीबी’ने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर आता नितीन देशमुखही रडारवर आल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement