कच्चा पुल‎ उभारला: खेडीभोकरी-भोकरमार्गे‎ जळगाव बसची मागणी‎ ; भोकर येथे तापीपात्रात तात्पुरता कच्चा पूल तयार‎


चोपडा10 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

तालुक्यातील‎ खेडीभोकरी व जळगाव‎ तालुक्यातील भोकर या गावाच्या‎ मध्यभागी असलेल्या तापी‎ नदीपात्रात, तात्पुरता कच्चा पुल‎ उभारण्यात आला आहे. या‎ ठिकाणाहून चोपडा आगारातून‎ खेडीभोकरीमार्गे जळगाव व‎ भोकरमार्गे चोपडा बसेस सुरू‎ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत‎ आहे.‎ वर्षभरापुर्वी जळगाव ते चोपडा‎ दरम्यान खेडीभोकरी, भोकर मार्गे‎ १११ कोटी रुपये खर्च करून, नव्याने‎ रस्ता तयार करण्यात आला आहे.‎ चोपड तालुकावासीयांसाठी हा रस्ता‎ कमी अंतराच्या आहे. त्यामुळे‎ बहुतांश खासगी वाहने भोकरमार्गे‎ जळगावला जात आहेत. त्यामुळे‎ अनेक प्रवाशांनी‎ जळगाव-चोपडा-भोकर मार्गे बस‎ सुरू करण्याची मागणी चोपडा‎ आणि जळगाव अशा दोन्ही‎ आगारात केली आहे.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement