औरंगाबाद2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी ४ मार्च रोजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतर विरोधी संघर्ष समितीतर्फे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्याच्या विरोधात आयोजित साखळी उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी एका तरूणाने औरंगजेबचे फोटो पोस्टर हाती घेवून दोन गटांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ५ मार्च रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अज्ञात चौघांविरोधात कलम-१५३ (अ), ३४ नुसार सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीर आरेफ अली मीर फारुक अली यांच्या फिर्याद दिली.
काय आहे कलम १५३ (अ) आणि ३४
धर्म, भाषा, वंश इत्यादींच्या आधारे लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कलम १५३(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. या गुन्ह्यामध्ये ३ वर्षांपर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही या प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे. तर, भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ नुसार, जेव्हा एखादे गुन्हेगारी कृत्य सर्व व्यक्तींद्वारे समान हेतूने केले जाते, तेव्हा प्रत्येक व्यक्ती अशा कृत्यासाठी जबाबदार असतो. (प्रत्येक्षात फोटो, होर्डींग जरी एका तरूणाच्या हाती असले तरीसुद्दा सोबत असणाऱ्या इतर तिघांचाही तोच समान हेतू असल्याने त्यांच्यावरही कलम ३४ नुसार तोच गुन्हा दाखल केला जातो.)
दुसऱ्या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ४ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घाटी परिसरातील एका चौकाला दिलेल्या वादग्रस्त नावावरून साजिद सईद शेख (२३ रा.चिकलठाणा) याच्या विरोधात मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.