औरंगाबाद: 650 पैकी 250 शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र प्राप्त, ​​​​​​​प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश जारी


Advertisement

प्रतिनिधी । औरंगाबाद11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

शासनाने राज्यात 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र तपासणीचे आदेश जारी केले आहेत. आत्तापर्यंत 2013 नंतर औरंगाबाद जिल्ह्यात रुजू झालेल्या 650 पैकी 250 शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत.

Advertisement

शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकारानंतर आता शिक्षण विभागाकडून प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्र परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे. या दरम्यान प्राथमिकचे दोनशे; तर माध्यमिकचे 360 शिक्षक शिक्षण सेवेत रुजू झाले आहेत. या सर्व शिक्षकांच्या टीईटी मूळ प्रमाणपत्र व वैयक्तिक मान्यता आदेशाची छायांकित प्रत कार्यालयास सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. आत्तापर्यंत शिक्षण विभागाला 250 शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. अद्याप तीनशे शिक्षकांचे मूळ टीईटी प्रमाणपत्र प्राप्त होणे बाकी आहे. यासंदर्भात गुरुवारी औरंगाबाद वेतन व भविष्य निर्वाहनिधी पथक माध्यमिक शिक्षण विभागाने पुन्हा एकदा आदेश जारी केले आहेत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement