औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लुट करून विमा कंपन्या मालामाल केल्या, कोरोनामुळे सरकार टिकुन, लाट ओसरताच सळो की पळो करून सोडणार – अनिल बोंडे


Advertisement

औरंगाबादएका मिनिटापूर्वीलेखक: संतोष देशमुख

  • कॉपी लिंक
  • माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पत्रकार परिषदेत माहिती

केंद्र सरकारने पंतप्रधान विमा योजना लागू केली आहे. त्याची महाविकास आघाडी सरकारने अंमलबजावणी न करता खासगी विमा कंपन्या नेमून शेतकऱ्यांची लुट केली. विमा कंपन्यांना मालामाल केले आहे. कोरोनामुळे सरकार आजवर टिकुन असून लाट ओसरताच शेतकरी भाजपच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून सळो की पळो करून सोडणार आहेत. अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

भाजपच्या काळात १२८ लाख पैकी ८५ लाख शेतकऱ्यांना ५७९५ कोटी रुपये विमा नुकसान भरपाई मिळाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात १०७ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा संरक्षण घेतले होते. याकरता शेकऱ्यांनी ५३० कोटी, राज्य सरकार २४३८ कोटी आणि केंद्र २२४९ कोटी असे एकुण ५२१७ कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांकडे भरला होता. खरिपात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, चक्रीवादळे, महापुर, सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडून पिकांची माती झाली होती. बोंडअळीने कापुस, लष्करी अळीने मका, ज्वारी आदी पिक फस्त केली. याची नोंद कृषी, महसूल विभागाने घेतली आहे. सरकारने तंटपुंजी अर्धवट स्वरूपात नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. असे असताना विमा कंपन्यांनी उंबरठा उत्पादन कशाच्या आधारावर नोंदवले व भरपाई दिली नाही? यात कंपन्यांनी कृषी, महसूल आणि सरकारला हाताशी धरून शेतकऱ्यांना मारले आहे. यामुळेच १०७ लाख पैकी केवळ १५ लाख शेतकऱ्यांना नाममात्र ९७४ रुपये भरपाईत समावेश केला. तर यापैकी ११ लाख शेतकऱ्यांना ७४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. उर्वरित सर्व शेतकरी हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहेत. कंपन्यांनी ४२३४ कोटी रुपये निव्वळ नफा कमावलेला आहे. हे सर्व षडयंत्र उघड पाडण्यासाठी आम्ही कृषी विभागनिहाय दौरा करत असून आज औरंगाबाद येथे आलो आहोत. तालुकानिहाय आंदोलन सुरु केली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे. उंबरठा उत्पादन काढताना ९० टक्के जोखीम स्तर स्वीकरावा. महसुल मंडळाकरता योग्य हवामानामध्ये असलेली महत्तम उत्पादकता कृषी विद्यापीठकडून मागवून त्या आधारावर उंबरठा उत्पादकता काढावी. हाच निकष असावा. ३ वर्षासाठी केलेला विमा कंपन्यासोबतचा करार रद्द करावा. सुधारित उंबरठा उत्पादकता काढून नुकसान भरपाई द्यावी, पिक कापणी शेतकऱ्या समक्ष व्हावी. आदी मागण्यासाठी सरकारच्या मागे सोटा घेऊन लागणार असल्याचे बोंडे म्हणाले. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वसुदेव काळे, विजय औताडे, आमदार प्रशांत बंब, कल्याण पाटील गायकवाड, एकनाथ जाधव, राधाकिसन पठाडे आदी उपस्थित होते. खा. डॉ. कराड यांनी आंदोलन तीव्र करण्याचा तर बागडे यांनी कंपन्यांच्या नफाखोरीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला असून सरकरवरील विश्वास उडाला असून याचा हिशेब सरकारला आगामी काळात द्यावा लागेल, असा इशारा दिला.

शेतकरी हवालदिल
राज्यातील शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई मिळत नाही. दर्जेदार बी बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आली नाही. बाजारातील बोगस बियाणे व खतांवर कुणाचे नियंत्रण नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोनामुळे कडक निर्बंध आहेत. त्यामुळे सरकार टिकून आहे व श्वास घेत आहे. जसा कोरोना संसर्ग ओसरेल तसे सरकारच्या पायउत्ताराला सुरुवात होईल, असे बोंडे म्हणाले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here