औरंगाबाद: जिल्हयातील शाळा-महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, शिक्षकांना मात्र शाळेत नियमानुसार उपस्थित रहावे लागणार


Advertisement

औरंगाबाद27 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोविड – १९ च्या ओमायक्रॉन व्हेरिएंट चा वाढता प्रसार विचारात घेऊन शासनाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. या सुधारित मार्गदर्शक सूचना आणि अटीनुसार औरंगाबाद जिल्हयातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली.

Advertisement

यावेळी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या कालावधीत वेगवेगळ्या परीक्षा मंडळांनी विहित केलेली परीक्षा विषयक कामे पूर्ण करता येईल, प्रत्यक्ष वर्ग अध्यापन वगळून शिक्षकांना प्रशासकीय काम आणि ऑनलाइन अध्यापनाचे कामकाज सुरु ठेवता येईल. शालेय शिक्षण विभागाने विहित केलेल्या कामांची कार्यवाही पूर्ण करता येईल. हे करतांना कोविड १९ नियमांचे पालन करावे असे आदेशात म्हटले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement