औरंगाबाद: खा. खडसेंकडून भाजपला सांभाळत सासऱ्याचीही ‘रक्षा’, ईडीप्रकरणी बचावात्मक पाऊल


Advertisement

औरंगाबाद35 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या ईडी प्रकरणावर त्यांची सून आणि रावेर मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांनी बोलताना सासरे एकनाथ खडसे व भाजपला सांभाळून घेतले. रक्षा खडसे बुधवारी औरंगाबादच्या भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. भाजप खडसेंना त्रास देत असून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ईडीची चौकशी लावली काय, असे विचारताच यावर सरळ सरळ उत्तर देण्यास रक्षा खडसे यांनी टाळले. थोडा विचार करून एकदा चौकशी होऊन जाऊ देत, लवकरच सत्य काय ते बाहेर येईल, असे सांगताना भाजप विनाकारण कुणालाही त्रास देत नसल्याचे स्पष्ट करतानाच रक्षा खडसे यांनी भाजपलाही न खडसावता आपल्या सासऱ्यांची रक्षा केली. भाजपच्या वतीने राज्यभरात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाल्यानिमित्त पत्रकार परिषद पंधरवड्याचे आयोजन केले आहे. बुधवारी महिला अत्याचारांवर रक्षा खडसे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांच्यासोबत झालेला संवाद.

Advertisement

प्रश्न : माजी मंत्री खडसे यांनी मी भाजप सोडताच ईडीची चौकशी लावल्याचा आरोप केला? खरंच भाजप ईडीच्या माध्यमातून राजकीय नेत्यांना त्रास देत आहे का?
रक्षा खडसे : नाथाभाऊंची सून म्हणून मला हा प्रश्न अपेक्षित होताच. (थोडा वेळ विचार करून) एखादी चौकशी होते तेव्हा सत्य बाहेर येतेच. भाजपवर विरोधकांकडून असा आरोप केला जात आहे. ईडीद्वारे अनेकांची चौकशी केली जाते. जेथे आवश्यकता वाटते तेथे अशा प्रकारची चौकशी होते. कुणाही एका पक्षाच्या नेत्याची चौकशी होत नाही तर सर्वांची केली जात आहे. चौकशीअंती स्पष्ट होईल. खडसे साहेब अजूनही चौकशीच्या फेऱ्यात आहेत हे सत्यच आहे. लवकरच सर्व तथ्य जनतेसमोर येणारच आहे. कोर्टाच्या माध्यमातून प्रश्न निकाली निघणार आहे, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

प्रश्न : नाथाभाऊंची भेट झाल्यानंतर कधी राजकीय विषयावर चर्चा होते का?
रक्षा खडसे : आपले राजकारणातले गुरू नाथाभाऊ आहेत. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आले. त्यांचे खूप राजकीय मार्गदर्शन मला लाभले. आता केवळ कौटुंबिक मार्गदर्शनच त्यांच्याकडून मिळते. राजकीय विषयावर आमच्यात चर्चा होत नाही. सासरे जरी असले तरी माझ्या आयुष्यात त्यांचे वडिलांचे स्थान आहे. मी त्यांना वडील मानते. आता नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत. त्यांचा पक्ष वाढवण्याची जबाबदारी जशी त्यांच्यावर आहे तसेच भाजप वाढवण्याची माझी जबाबदारी आहे. यातून आम्ही कुठेच वितुष्ट येऊ देत नाही.

Advertisement

प्रश्न : राज्यात भाजपचे सरकार असतानाही महिलांवर अत्याचार होत होते? भाजपशासित राज्यांतही अत्याचार सुरूच आहेत. मग महाविकास आघाडीच्या विरोधातच रान का उठवले जात आहे?
रक्षा खडसे : भाजपच्या काळात अत्याचार झाला की त्याची तातडीने दखल घेत गुन्हे दाखल केले जात होते. आता आरोपी मोकाट फिरत आहेत.

न्यायालयाने ताशेरे ओढले तरीही आरोपींना पकडले जात नाही. भाजपशासित राज्यांतही गुन्हेगारांवर थेट कारवाई होत असून यापूर्वीही झालेली आहे. पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, उपाध्यक्ष माधुरी अदवंत, मनीषा भन्साळी, शहर भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा अमृता पालोदकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बस्वराज मंगरुळे, जिल्हा भाजप उपाध्यक्ष लक्ष्मण आौटी, मनीषा मुंडे, रूपाली वाहुळे, राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.

Advertisement

प्रश्न : २०२४ नंतरही रक्षा खडसे भाजपमध्ये दिसतील का?
रक्षा खडसे : मी स्वखुशीने भाजपमध्ये आहे. माझ्यावर कुणीही जबरदस्ती केली नाही. मागील १२ वर्षांपासून भाजपचे काम करते. भविष्यातही काम करत राहणार. २०२४ नंतरही आपणास उमेदवारी मिळो अथवा न मिळो, आपण भाजपमध्येच राहू. नाथाभाऊंशी कौटुंबिक संबंध आहेत आणि यापुढेही राहतील. परंतु आता आमच्यात कुठलेच राजकीय संबंध राहिलेले नाहीत.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here