औरंगाबाद: कायम स्वरुपातील वाहन परवाना सादर करण्यासाठी मुदतवाढ द्या; सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची मागणी


Advertisement

औरंगाबादएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी झालेल्या उमेदवारांनी आवश्यक असलेल्या कायम स्वरुपातील वाहन परवाना (वैध अनुज्ञाप्ती) सादर करण्यासाठी मुदवाढ देण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्व्ारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांना एमपीएससी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement

दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना सदर पदासाठीचे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर आहे. परंतु या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी गिअर्स असलेली मोटार सायकल आणि हलके मोटर वाहन चालविण्यासाठीचा कायम स्वरुपाचा परवाना (वैध अनुज्ञाप्ती) मागितले आहे. मात्र पूर्व परीक्षा झाल्यापासून कोरोना प्रतिबंधक कार्यवाहीसाठी सरकारी आदेशामुळे प्रशिक्षण केंद्रे बंद होते. तसेच इतरही संचार बंदीमुळे प्रशिक्षण दिलेल्या वेळेत अनेक उमेदवारांना पूर्ण करता आलेले नाही.

अनेक उमेदवार हे लॉकडाऊनमुळे गावी देखील गेले होते. काही उमेदवारांकडे सद्यस्थितीत हलके मोटार वाहननासाठीचे वैध कायम स्वरुपातील अनुज्ञाप्ती उपलब्ध आहे. परंतु गिअर्स असलेले मोटर सायकलचे वैध अनुज्ञाप्ती उपलब्ध नाही. तेंव्हा मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी देत ती कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देत लर्निंग लायसेन्स सद्यस्थितीत ग्राह्य धरावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर, निलेश गायकवाड, महेश घरबुडे, विश्मभर भोपळे यांची नावे आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here