औरंगाबादेत 4 दिवसीय आंबा महोत्सव: नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा खरेदीची पर्वणी, कृषी उत्पन्न बाजार समितीत आंबा महोत्सव


औरंगाबाद10 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 23 मे दरम्यान चार दिवस जाधववाडी बाजार समिती आवारात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरवासीयांना नैसर्गिकरित्या पिकवलेला दर्जेदार देवगड, रत्नागिरी, दापोलीचा हापूस आंबा तीनशे ते सहाशे रुपये डझन आणि केशर 120 ते 150 रुपये किलो दराने खरेदी करण्याची पर्वणी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे यांनी दिली.

Advertisement

आंबा उत्पादकांना त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्राहकांना किफयतशीर दरात व गुणवत्तापूर्ण आंबे मनाप्रमाणे खरेदी करता यावेत, मधल्या दलालीत होणारी आर्थिक, मानसिक लुटीला पायबंद बसावा. उत्पादक ग्राहक यांचे संबंध दृढ व्हावेत. बाजारात हापूसच्या नावे विक्री होणाऱ्या डुप्लिकेट हापूसची विक्रीला आळा बसावा. शहरवासीयांना ओरीजनल हापूस व कसेरची ओळख व्हावी. असे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन बाजार समितीत पणन महामंडळ प्रशासनाच्या पुढाकाराने आंबा महोत्सव आयोजित केला जातो.

मात्र, कोरोना महामारीमुळे गत दोन वर्षे आंबा महोत्सवाला ब्रेक लागला होता. 2018-19 मध्ये उत्पादकांनी 12 टन आंबा विक्री केला होता. याचा शहरवासीयांना व आंबा उत्पादकांना फायदा झाला होता. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन यंदा तीन दिवसांऐवजी चार दिवसीय आंबा महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड येथील 17 हापुस आंबा उत्पादक व 23 केशर आंबा उत्पादकांनी आंबा विक्रीसाठी समितीकडे नोंद केली आहे. म्हणजे एकुण 30 आंबा उत्पादकांचे स्टाॅल लागणार आहे. फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते 20 मे रोजी सकाळी 9 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. तर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांड्ये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, आदी उपस्थित राहणार असल्याचे काळे म्हणाले.

Advertisement

राहण्याची जेवणाची व्यवस्था
महिला आंबा उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समिती गेस्ट हाऊस व शेतकऱ्यांची शेतकरी भवनात राहण्याची व जेवणाची व्यवस्था बाजार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement