औरंगाबादेत एलपीजी ऑटोरिक्षाने घेतला पेट: सुदैवाने सिलिंडरचा स्फोट नाही; मोठा अनर्थ टळला, उच्च न्यायालयासमोरच घडली घटना


औरंगाबाद10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

बुधवारी सकाळी 10.50 वाजेच्या सुमारास उच्च न्यायालयासमोर एम एच 20 ईएफ 1142 क्रमांकाच्या धावत्या एलपीजी ऑटोरिक्षाने पेट घेतला होता. सेवन हिल सिडको अग्निमशन दलाच्या पथकाने त्वरीत धाव घेऊन पाण्याने आग विझवली. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाला नाही व मोठा अनर्थ टळला.

Advertisement

मुख्य जालना रोडवर सिडकोकडून आकाशवाणीकडे धावणारी एलपीजी ऑटोरिक्षा उच्च न्यायालया जवळ येताच पेट घेतला होता. काही वेळेतच आगीने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, चालक व सुज्ञ नागरिकांनी सिडको अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. चार मिनिटांच्या आत गाडी व पथक हजर झाले व पाण्याचा मारा करून त्यांनी भडकलेली आग पाच मिनिटांत विझवली. आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला तेव्हा सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही. अतिशय वर्दळीचा मार्ग असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

यांनी विझवली आग

Advertisement

मनपा अग्निमशनम विभागाचे प्रमुख राजू सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वि. के. राठोड, आर. आर. सोनवणे, एस. बी. होळंबे आणि चालक विनोद तुपे यांनी आग विझवली.

शहर परिसरात अनधिकृत एलपीजी सीएनजी सिलेंडर बसून 1000 ऑटो रिक्षा धावत आहेत. याबाबत दिव्य मराठीने 5 सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच सिलेंडरची तपासणी केली जात नाही. त्यावरही पोलीस व आरटीओ प्रशासनने कोणतीच कारवाई केलेली नाही. परिणामी परस्पर सिलेंडर बसवण्याचा गोरख धंदा देखील वाढला आहे. सिलेंडर गॅस बाॅंब सारखाच असतो. स्पोट जर झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने बघून विशेष कारवाई होणे देखील तितकेच गरजेचे झाले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement