औरंगाबादमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन: डॉ. सुधीर रसाळांच्या हस्ते होणार उद्घाटन; 2 दिवस विविध कार्यक्रमांची मांदियाळी


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या विद्यमाने शनिवारी 26 आणि रविवार 27 नोव्हेंबरला औरंगाबाद ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री व विविध भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.या ग्रंथोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन औरंगाबाद ग्रंथोत्सव समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री अण्णाभाऊ साठे व जी.ए.कुलकर्णी ग्रंथ दालन तसेच विविध कार्यक्रमासाठी कवियित्री शांताबाई शेळके, शंकर रमाणी व्यासपीठ व वसंत बापट प्रेक्षागृह उभारण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 सकाळी 10.30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या हस्ते होणार आहे.

Advertisement

विशेष अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री, रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री. डॉ. भागवत कराड तर अध्यक्षस्थानी राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सय्यद इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जैस्वाल, आ. उदयसिंग राजपुत,आ. रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, डॉ. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांची उपस्थिती असणार आहे.

असे होतील कार्यक्रम

Advertisement

– ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी नऊ वाजता ग्रंथ दिंडी क्रांती चौक ते कार्यक्रम स्थळ पर्यंत निघणार आहे. यावेळी अनंत गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी, औरंगाबाद, एम.के. देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्य.) औरंगाबाद, एस. एन. साबळे, उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, औरंगाबाद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

– सकाळी 10.30 वा. उद्घाटन होणार आहे. यावेळी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिका सामूहिक वाचन होईल. दुपारी दोन वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचक बहुसंख्य पर्यायात हरवत चालला आहे. यावर परिसंवाद होईल. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रा. शं. बालेकर असून सहभाग : डॉ. रमेश रावळकर, डॉ. शिवाजी हुसे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. महेश खरात, डॉ. समिता जाधव. सायं. 5.00 वा. हास्यरंग थोडं बसा आणि भरपूर हसा. सादरकर्ते :हास्य कवि प्रा. डॉ. विष्णु सुरासे(मराठवाडा एक्सप्रेस) हे आहेत.

Advertisement

– औरंगाबाद ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार, 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ‘भारतीय आणि मराठवाडा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व लोकशाहीचे भवितव्य’ यावर परिसंवाद होईल. अध्यक्ष:- डॉ. ऋषिकेश कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक,सहभाग:- डॉ. कैलास अंभुरे, डॉ. अनिरूध्द मोरे, डॉ. इकबाल मित्रे.

– दुपारी 2.00 वाजता काव्यवाचन. अध्यक्ष – अभय दाणी. सहभागः आशा डांगे, ज्योती सोनवणे, माधुरी चौधरी, पंजाबराव मोरे, भास्कर पाटील, सुनील उबाळे, सुदाम मगर, हबीब भंडारे, प्रिया धारूरकर, रंजन कंधारकर. ग्रंथ प्रदर्शन व विक्री सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहे.

Advertisement

– ग्रंथोत्सवाचा समारोप दुपारी 4.00 वाजता होणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement