औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी मोडून काढा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा, पुणे पोलिसांची आज चाकणमध्ये बैठक


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

माथाडी संघटनांकडून उद्योगांना ब्लॅकमेल केले जात असल्याने, आपल्या राज्यातील गुंतवणूक इतर राज्यात जात असल्याची जाहीर कबुली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुण्यातील एका कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेत, आज चाकणसह इतर औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.

Advertisement

चाकण एमआयडीसी मधील ब्रिजस्टोन कंपनी येथे ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत चाकण एमआयडीसी मधील सर्व कंपनी व्यवस्थापक, मालक, प्रतिनिधी, जनरल मॅनेजर, एच.आर. सहभागी होणार आहे. यामध्ये विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड,रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, मनोज लोहिया, सहपोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड,अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, विवेक पाटील साहेब, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक, पिंपरी चिंचवड, प्रेरणा कट्टे , सहा. पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी चिंचवड हे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

समस्यांवर चर्चा

Advertisement

या बैठकीमध्ये कंपन्यांना भेडसावणारे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, महिला कामगारांचे प्रश्न, वाहतुक समस्या, एमआयडीसी आणि माथाडी कामगारांशी संबंधित समस्या या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. अशी माहिती महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली आहे.

उद्याेगांना ब्लॅकमेल करणाऱ्यांवर कडक कारवाई

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, पुण्यात पायाभूत सुविधा अधिक प्रमाणात निर्माण केले तर माेठया प्रमाणात आयटी, संशाेधन, उद्याेग यांचे हब विस्तरीत हाेईल. उद्याेगांना जर काेणी त्रास देत असेल तर ताे काेणत्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा त्याचे मुसक्या बांधा असे आदेश पाेलिसांना दिले.

उद्याेग दुसऱ्या राज्यात

Advertisement

आपल्याकडे उद्याेग येण्यास तयार आहे. परंतु ब्लॅकमेलर माेठया प्रमाणात पैसे वसुली करतात. आम्हालाच कंत्राट द्या, दुसऱ्याला काम करुन देणार नाही असे म्हणणाऱ्यांचे कंबरडे माेडून काढावे लागणार आहे. ज्याप्रकारे उद्याेजकांना वसुलीचे धमक्या येतात त्यामुळे उद्याेग दुसऱ्या राज्यात जात असल्याने आपल्याकडे राेजगार निर्माण हाेणार नाही. ब्लॅकमेल करणाऱ्यांना पाेलिसांनी धडा शिकवावा अन्यथा पाेलिसांनाच कारवाईस सामाेरे जावे लागेल असा इशारा फडणवीस यांनी दिला.

उद्याेगात राजकारण अाणले नाही पाहिजे.कामगारांचे खांद्यावर बंदूक ठेवून काेणी स्वत:चे घर सांभाळत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement