ओशो आश्रमाच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप: पुण्यातील आश्रमात 2 हजार कोटींचा घोटाळा केला, भक्ताकडून ईडी चौकशीची मागणी


पुणे | प्रतिनिधी38 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अध्यात्मिक गुरू आचार्य ओशो रजनीश यांची आज 33वी पुण्यतिथी. यानिमित्त ओशो यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून ओशो भक्त पुण्यातील कोरेगाव परिसरातील ओशो आश्रम येथे दाखल झाले आहेत. मात्र, भक्तांना ओशो इंटरशॅनल फाऊंडेशन या आश्रम प्रशासनाकडून समाधीस्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भक्तांनी आता आंदोलन सुरु केले आहे.

Advertisement

अशातच गोवा येथील ओशो भक्त स्वामी ध्यान अमीन ऊर्फ मनोज झा यांनी ओशो आश्रम प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ओशो आश्रमच्या ट्रस्टींनी दोन हजार कोटीं रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप मनोज झा यांनी केला आहे. तसेच, याबाबत ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

बजाजला 107 कोटींना जमीन विकली

Advertisement

मनोज झा यांनी सांगितले की, पुण्यातील ओशो आश्रम समाधीस्थळ भक्तांसाठी महत्त्वपूर्ण आहे. १६० देशातून याठिकाणी दररोज दोन हजारच्या आसपास भक्त येतात. त्यामुळे या भागात मोठी आर्थिक उलाढाल होऊन राज्यास परदेशी पैसे मिळत होते. परंतु सध्या विदेशात बसलेले आश्रमाचे विश्वस्त ओशो आश्रमचे महत्त्व कमी करत आहेत. याठिकाणची एक जमीन बजाज समूहाला 107 कोटी रुपयात विक्री केली.

कोरेगाव परिसरातील ओशो आश्रमात जाण्यास प्रशासनाकडून बंदी घातल्याने भाविकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

कोरेगाव परिसरातील ओशो आश्रमात जाण्यास प्रशासनाकडून बंदी घातल्याने भाविकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Advertisement

अर्ध्या तासासाठी 970 रुपये शुल्क
मनोज झा यांनी सांगितले की, पुणे आश्रमात भक्तांना समाधीस्थळी जाण्यापासून रोखल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिकेमार्फेत दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने त्यानुसार समाधीस्थळ घोषित करुन भक्तांना दर्शनास जाऊ देण्यास सांगितले. परंतु, सध्या समाधी दर्शनास जाण्याकरिता 970 रुपये अर्ध्या तासाकरिता आकारले आहे. भक्तांचा याठिकाणाचा वावर कमी करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे.

आश्रम परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

Advertisement

जगभरातील ओशो भक्तांचे श्रध्दास्थान हे पुण्यातील ओशो आश्रममधील ओशो रजनीश यांचे समाधीस्थळ आहे. याठिकाणी भक्तांना जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने भक्तांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे परिसरात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनतर्फे तैनात करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ओशो भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. तरीसुध्दा ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखले जात आहे, असे भक्तांचे म्हणणे आहे.

भक्तांना घेतले होते ताब्यात

Advertisement

परिणामी भक्तांनी आक्रमक पवित्रा घेत बुधवारीच आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी काही भक्तांना ताब्यात घेऊन रात्री सोडून दिले होते. त्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळपासूनच ओशो भक्त आश्रमाच्या मुख्य दरवाजावर एकत्रित आले. त्यांनी ओशो यांचे समाधीस्थळी दर्शनास जाण्याची परवानगी मागत आंदोलन सुरु केले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement