ऑस्कर अवॉर्ड 2023 सोहळ्याला प्रारंभ: RSS ची तीन दिवसीय बैठक, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारताने रचला इतिहास9 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ऑस्कर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरुवात

Advertisement

अमेरिकेच्या लॉस एंजेलिस इथल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत असलेल्या ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी दीपिका पदुकोण प्रेझेंटर म्हणून पोहोचली आहे. RRR चित्रपटाच्या संपूर्ण टीमनेही रेड कार्पेटवर शानदार एन्ट्री घेतली आहे. यावेळी भारतातून ऑस्कर अवॉर्डसाठी तीन नामांकन आले आहेत. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला , डॉक्युमेंटरी फीचर चित्रपट श्रेणीतील चित्रपट ऑल दॅट ब्रीद्स आणि मूळ लघुपट श्रेणीतील द एलिफंट व्हिस्पर्स या गाण्याला अंतिम नामांकन मिळाले आहे. वाचा सविस्तर

समलैंगिक विवाह आदर्श नाही- केंद्र सरकार

Advertisement

केंद्र सरकारने समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना सर्वाेच्च न्यायालयात विराेध केला आहे. त्यासाठी केंद्राने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात स्त्री व पुरुष म्हणजेच विषमलिंगी यांचा विवाह समाजाचे अस्तित्व आणि सातत्य राखण्याचे मूलभूत तत्त्व आहे. समलैंगिक विवाह आदर्श हाेऊ शकत नाहीत. ते भारतीय परंपरेच्या विरुद्ध ठरतात असे केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. वाचा सविस्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय बैठक

Advertisement

हरियाणाच्या समालखामध्ये रविवारपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू झाली. देशभरातून ३४ संघटनांचे १४७४ प्रतिनिधी या सभेत भाग घेत आहेत. प्रतिनिधी सभेने पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीआधी देशात एक लाख ठिकाणांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प सोडला आहे. सोबतच अधिकच्या ४२% शाखा वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डाही सहभागी झाले होते.

निवडणुकीच्या 3 राज्यांत आम आदमी पक्ष सक्रिय

Advertisement

आम आदमी पक्षानेे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीला अंतिम रूप दिले आहे. सोमवारी या अभियानाचा प्रारंभ आप राजस्थानमधून करणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जयपूरमध्ये शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मंगळवारी दोन्ही नेते मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सभेद्वारे राजद्यातील वातावरणाचा अंदाज घेतील. आपचे सर्वाधिक लक्ष राजस्थानवर आहे. पंजाबलगतच्या भागांकडे आप ‘साॅफ्ट टार्गेट’ म्हणून पाहत आहे. वाचा सविस्तर

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारताने रचला डाेंगर

Advertisement

यजमान टीम इंडियाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या डावात धावांचा डाेंगर रचला आहे. फाॅर्मात आलेल्या माजी कर्णधार विराट काेहलीने १८६ धावा करत आणि शानदार शतक साजरे करताना १६ व्यांदा दीड शतकी भागीदारी रचली आहे. यादरम्यान अक्षर पटेलनेही ७९ धावा करत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाला अहमदाबाद कसाेटीच्या पहिल्या डावात ५७१ धावा काढता आल्या. यातून टीम इंडियाने पहिल्या डावामध्ये ९१ धावांची आघाडी मिळवली आहे. वाचा सविस्तर

आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे…..

Advertisement

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर अवॉर्ड सोहळ्याला सुरुवात झाली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीचा पाचवा दिवस.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement