ऐनवेळी गेली वीज; मंत्री अतुल सावे ‎ध्वजाराेहणासाठी २५ मिनिटे वेटिंगवर‎: परभणीत नियोजनाचा ढिसाळपणा, मनपा- वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव‎

ऐनवेळी गेली वीज; मंत्री अतुल सावे ‎ध्वजाराेहणासाठी २५ मिनिटे वेटिंगवर‎: परभणीत नियोजनाचा ढिसाळपणा, मनपा- वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव‎


परभणी‎एका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

परभणीः विद्युत पुरवठा बंद झाल्याने तो सुरू होण्याची वाट पाहत असलेले‎मान्यवर. या वेळी मंत्री सावे यांना २५ मिनिटे थांबावे लागले.‎

  • नांदेडमधील कार्यक्रमाचाही उडाला फज्जा‎

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त अायाेजित‎कार्यक्रमात नियोजनाचा ढिसाळपणा अनुभवण्यास‎मिळाला. सकाळी १२० फूट उंच व ४० मीटर लांब‎राष्ट्रध्वज गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण‎मंत्री अतुल सावे फडकवायला जाणार होते. राष्ट्रध्वज‎स्तंभाचे अनावरण करण्यासाठी सकाळी ९.३० वाजता‎मंत्री सावे बटण दाबणार तोच विद्युत पुरवठा खंडित‎झाला. या वेळी एकही वीज वितरण विभागाचा‎अधिकारी उपस्थित नव्हता. २५ मिनिटांच्या नंतर वीज‎आल्यावर ध्वज फडकावला गेला. या गोंधळामुळे मंत्री‎सावे प्रचंड संतापले व त्यांनी महावितरणच्या‎अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. नांदेडमध्येही ढिसाळ‎नियोजन पाहायला मिळाले.‎

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राजगोपालाचारी‎उद्यानातील हुतात्मा स्मारक येथे पुष्पांजली, पुष्पचक्र‎अर्पण व मुख्य शासकीय राष्ट्रध्वज ध्वजारोहण कार्यक्रम‎पार पडला. याच दरम्यान उद्यानात मनपा प्रशासनाकडून‎उभारण्यात आलेल्या १२० फूट उंच व ४० मीटर उंचीच्या‎राष्ट्रध्वजस्तंभाचे अनावरण मंत्री अतुल सावे यांच्या‎हस्ते करण्यात आले. या वेळी खा. संजय जाधव, आ.‎डॉ. राहुल पाटील, आ. मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी‎रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक रागसुधा आर. व‎वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठीक ९.३० वाजण्याच्या‎सुमारास मान्यवर कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले, परंतु ‎ऐनवेळी वीज गेल्याने एकच गोंधळ उडाला. २५ ‎मिनिटांनंतर ध्वजारोहण झाले.‎

Advertisement

…तर निलंबित केले असते‎

सावे यांनी महावितरणचे अधीक्षक‎अभियंता आर. बी. माने व परभणी‎शहराचे उपकार्यकारी अभियंता‎शिवणकर यांना चांगलेच झापले. ते‎म्हणाले की, तुम्ही मराठवाड्यात राहत‎नाहीत का?, राष्ट्रध्वज अर्ध्यात चढला‎असता तर तुम्हाला जागेवर निलंबित‎करायला मागेपुढे पाहिले नसते.‎ ऊर्जामंत्र्यांना बोलून तुमच्यावर कारवाई‎ करायला सांगतो.‎
भाषण एेकणे झाले अशक्य‎

Advertisement

जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा‎ फज्जा उडाल्याचे दिसून आले.‎नागरिकांना आसन व्यवस्था‎पालकमंत्र्यांच्या पाठीमागे होती. त्यातच‎मंडपाची उभारणी करण्यात आली‎नव्हती. त्यामुळे उन्हाचे चटके बसत‎होते. ध्वनिक्षेपक यंत्रणेचे नियोजन‎इतके सुमार होते की, कोणत्याही‎नागरिकांना त्यांचे भाषण ऐकता आले‎नाही. अनेकांनी काढता पाय घेतला.‎

ऐनवेळी गेली लाइट‎

Advertisement

राष्ट्रध्वज वर चढवण्यासाठी‎असलेल्या मोटरीसाठी थ्री फेज‎विद्युत पुरवठा आवश्यक आहे. त्या‎दृष्टीने पूर्ण व्यवस्था केली होती, परंतु‎ऐनवेळी वीज गेली. यामुळे विद्युत‎पुरवठा येईपर्यंत थांबावे लागले.‎जनरेटरवर मोटार चालवणे शक्य‎नसल्याने जनरेटरची व्यवस्था केली‎नव्हती.

– वसीम पठाण, शहर‎अभियंता, मनपा परभणी.‎

Advertisement

मानवंदनेनंतर आवाज‎

दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन‎हे ध्वजवंदन करून स्वातंत्र्यसैनिक‎आणि अभ्यागतांना भेटून परतले.‎तेवढ्यात बंदुकीचा आवाज झाला.‎मानवंदना झाल्यानंतर कदाचित एक‎गोळी चुकून राहिली असावी, अशी‎चर्चा सुरू होती. मात्र कुणालाही इजा‎झाली नाही. हा प्रकार केवळ आवाज‎होता. कोणतीही गोळी उडाली नाही,‎असे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण‎कोकाटे यांनी कळवले आहे.‎

AdvertisementSource link

Advertisement