एसटी स्थानकात प्रवासी महिलेचे 3 लाखांचे दागिने चोरीस: पुण्यात खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

एसटी स्थानकात प्रवासी महिलेचे 3 लाखांचे दागिने चोरीस: पुण्यात खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एसटी स्थानकात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून 3 लाखांचे दागिने चोरुन नेले. ही घटना वाकडेवाडीतील बसस्थानकात घडली अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. दरम्यान, गणेशोत्सवामुळे गावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर चोरट्यांकडून प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याचे घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

तक्रारदार महिला परगावी जाण्यासाठी 16 सप्टेंबरला वाकडेवाडी एसटी स्थानकात आल्या होत्या. त्यावेळी एसटीमध्ये प्रवेश करीत असताना, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या पर्समधील तीन लाखांचे दागिने चोरून नेले. बसमध्ये शिरल्यानंतर त्यांना दागिने नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने खडकी पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम पुढील तपास करीत आहेत.

मदतीच्या बहाण्याने चोरट्यांनी लुटले

Advertisement

एका एटीएम सेंटरमध्ये जेष्ठ नागरिकाला मदतीच्या बहाण्याने चोरट्यांनी हातचलाखीने 50 हजार रूपये काढून फसवणूक केली आहे. ही घटना येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये घडली आहे. दरम्यान, जेष्ठांसह अशिक्षित नागरिकांवर लक्ष ठेउन त्यांच्याकडील एटीएम ताब्यात घेउन दुसरे एटीएम हातात देत फसवणूक करणारी टोळी पुन्हा कार्यरत झाल्याचे दिसून आले आहे.तक्रारदार जेष्ठ नागरिक शास्त्रीनगरमधील युनियन बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिघा चोरट्यांनी त्यांना मदतीचा बहाणा करीत पैसे काढून देण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीकडून एटीएमचा पासवर्ड घेउन हातचलाखीने त्यांच्याकडील एटीएम ताब्यात घेतले. पैसे नसल्याचे सांगून जेष्ठाला चोरट्यांनी त्यांच्याकडील बनावट एटीएम कार्ड दिले. त्यानंतर काही वेळाने चोरट्यांनी त्यांच्या एटीएमद्वारे बँकखात्यातून 50 हजार रुपये काढून फसवणूक केली. बँकखात्यातून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विष्णू होले पुढील तपास करीत आहेत.Source link

Advertisement