एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सदावर्तेंवर निशाणा: म्हणाले- वकिलसाहेब स्वत: डिप्रेशनमध्ये गेले, त्यांच्याऐवजी आता दुसरे वकील बाजू मांडणार


Advertisement

एका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात जवळपास दोन महिन्यांपासून संप सुरु आहे. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एक बैठक पार पडली आहे.

Advertisement

या बैठकीला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. एकूण 22 एसटी कामगार संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला. वकिल साहेबांच्या आक्रस्ताळपणामुळे संपकरी कर्मचाऱ्यांची चूल बंद होत आहे, ते डिप्रेशनमध्ये आले असावेत, त्यांना लोकांना भडकावले, असा आरोप एसटी कर्मचारी प्रतिनिधींनी केला.

Advertisement

आमची चूक झाली आता आम्ही विकल बदलत आहोत, गुणरत्न सदावर्ते यांना हटवून त्यांच्याऐवजी वकिल सतीस पेंडसे यांच्याकडे युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आमची चूक झाली आता आम्ही विकल बदलत आहोत, गुणरत्न सदावर्ते यांना हटवून त्यांच्याऐवजी वकिल सतीस पेंडसे यांच्याकडे युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Advertisement

कर्मचारी कामावर परतले तर…
दरम्यान, कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, पगार कापला जाणार नाही, असे आश्वासन परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement