एसटी योजना: महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत; पहिल्याच दिवशी 547 बसमधून 14 हजार 557 महिलांनी केला प्रवास


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50% सवलत 17 मार्च पासून अमंलबजावणी सुरू झाली. त्याचा शहर जिल्ह्यातील आठ आगारातील 547 बस मधून पहिल्याच दिवशी 14 हजार 557 महिलांनी प्रवास सेवेचा लाभ घेतला. तर18 मार्चला महिला प्रवाशांची संख्या वाढली होती. त्यामुळे एसटीत बसायला जागा पकडण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले. एकमेकींना धक्काबुकी करत महिला बसमध्ये चढल्या होत्या.

Advertisement

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून ” मोफत ” प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. तर महाराष्ट्र राज्याच्या सन.2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 17 मार्च पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाते.

Advertisement

या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे. त्याला छत्रपती संभाजीनगर मधून पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद मिळाला असून एकाच दिवसांत चौदा हजार पाचशे सातावन महिला प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद विभागीय कार्यालयाने घेतली. यातून 50 टक्के 4 लाख 76 हजार 175 रुपये उत्पन्न मिळाले असल्याचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement